शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

फस(व)लेल्या सापळ्याचीच चर्चा अधिक

By admin | Updated: March 29, 2017 00:55 IST

नाशिक : गोष्ट खरी आहे की नाही याचा उलगडा होऊ शकला नसला तरी, जी काही चर्चा महसूल व लाचलुचपत प्रतिबंधक विभागात होत आहे त्यात तथ्य असण्याची शक्यताही नाकारता येऊ नये.

श्याम बागुल : नाशिकगोष्ट खरी आहे की नाही याचा उलगडा होऊ शकला नसला तरी, जी काही चर्चा महसूल व लाचलुचपत प्रतिबंधक विभागात होत आहे त्यावरून काही अंदाज बांधता येणारे आहेत व त्यात काहीअंशी तथ्य असण्याची शक्यताही नाकारता येऊ नये. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ महसूल अधिकाऱ्याभोवती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचला, परंतु या सापळ्यातून महसूल अधिकारी लिलया निसटला, त्यामुळे समस्त महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोण आनंद झाला! एरव्ही पुरवठा खात्यातील लाचखोरी, नांदगावचे जमीन प्रकरण, येवल्यातील वाळू तस्कर व बागलाणच्या शेतकऱ्यांच्या जमीन व्यवहार प्रकरणावरून गेल्या काही महिन्यांपासून महसूल विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक खात्यात चांगलीच जुंपलेली असताना व त्यातून पुन्हा थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लाचलुचपतने धडक दिल्याची बाब तशी महसूल खात्याला खटकली होतीच, परंतु त्यातही संबंधित अधिकाऱ्याने दाखविलेल्या चाणाक्ष बुद्धीचेही सर्वत्र कौतुक केले गेले.  अगदी दारापर्यंत पोहोचलेल्या लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याची बाब महसूल खात्याच्या मानात शिरपेच टाकणारी तर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला खाली मान घालायला लावणारी असल्याची चर्चाही यानिमित्ताने झडली. परंतु महसूल खात्याने हुरळून जाण्याचे की, लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानेही एखाद्या अपयशाने खचून जाण्याचे कारण नाही. कारण लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने आजवर टाकलेले वा रचलेले सापळे (?) सर्वच यशस्वी झाले असे कधीच घडले नाही व महसूल खाते पैसे खातच नाही, असा छातीठोक दावाही कोणी करू शकणार नाही. प्रश्न फक्त इतकाच आहे की, सापळा फसला की फसवला गेला.  लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अनेक सापळे जसे तक्रारदाराच्या चुकीमुळे अपयशी ठरतात, तसेच ते बऱ्याच वेळा लाच मागणाऱ्याच्या समयसुचकतेने यशस्वीदेखील ठरत नसतात. अशा वेळी लाचलुचपत खात्याला हात चोळत बसण्याशिवाय पर्याय नसतो हे जरी खरे असले तरी, काही सापळ्यांबाबत पाळलेली कमालीची गुप्ततादेखील संरक्षण खात्याची गोपनीय माहिती फुटावी तशी बाहेर फुटते. लाचेचा सापळा फसल्याने त्याबाबतची माहिती कशी व कोणी फोडली याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक खाते आत्मपरीक्षण करीत असेल तर कोणाची हरकत नसण्याचे कारण नसावे, पण तक्रार दाराव्यतिरिक्त फक्त तपासी अधिकाऱ्याशिवाय कोणालाही कर्णोपकर्णी तशी खबर नसण्याची पुरेपूर खबरदारी घेणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची गोपनीयता भंग होत असेल व त्यातून लाचखोरांना अभय मिळण्याची असेल तर दोषी कोण?   मुळात सरकारी यंत्रणेकडून कायदेशीर कामासाठी पैशांची मागणी केली जात असेल व निव्वळ मागणी पूर्ण होत नसल्यामुळेच जर काम अडविले जात असेल तरच कोणतीही व्यक्ती लाच द्यायला व त्याबाबतची तक्रार करायला धजावत असते,त्यामुळे तक्रारदाराकडून या गोपनीयतेचा भंग होणे अशक्यच असते, शिवाय लाचलुचपत खाते तक्रारदाराचा जबाब त्याच्याच स्वहस्ताक्षरात लिहून त्यावरच त्याची जबाबदारी निश्चित करीत असते, त्याचबरोबर तक्रारदार देत असलेल्या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी रंगीत तालीमही करून घेत असते. अगदी सापळा यशस्वी होईपर्यंत सरकारी पंचांनादेखील या कारवाईपासून अनभिज्ञ ठेवले जाते अशी कडेकोट खबरदारी घेत असताना सापळा अयशस्वी होत असेल तर शंका कोणावर घेणार? लाचलुचपतमध्येही कीड लागली असा अर्थ त्यातून कोणी काढला तर? असो. महसूल खात्याच्या अधिकाऱ्यावर लावलेला सापळा तूर्त टळला आहे. हा सापळा टाळला गेला याची माहिती त्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचविण्यात मात्र लाचलुचपत प्रतिबंधक खाते यशस्वी झाले आहे, तसे नसते तर या सापळ्याची चर्चा महसूल खात्यात होणे अशक्यच होते.