मोबाईल चोरट्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 06:20 PM2018-08-24T18:20:43+5:302018-08-24T18:21:19+5:30

नाशिक : पादचारी इसमाचा मोबाईल बळजबरीने हिसकावणाऱ्या एकलहरा रोडवरील मोबाईल चोरट्यास गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ यश राजेंद्र पाटील (१९, रा. रेल्वे ट्रॅक्शनसमोर, एकलहरा रोड, संभाजीनगर, नाशिकरोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्या अन्य साथीदाराचा शोध सुरू आहे़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Mobile thieves arrested | मोबाईल चोरट्यास अटक

मोबाईल चोरट्यास अटक

googlenewsNext
ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या युनिट एकने केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पादचारी इसमाचा मोबाईल बळजबरीने हिसकावणाऱ्या एकलहरा रोडवरील मोबाईल चोरट्यास गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ यश राजेंद्र पाटील (१९, रा. रेल्वे ट्रॅक्शनसमोर, एकलहरा रोड, संभाजीनगर, नाशिकरोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्या अन्य साथीदाराचा शोध सुरू आहे़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित यश पाटील व त्याच्या साथीदाराने १८ आॅगस्ट रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास काळ्या रंगाच्या डीओ मोपेडवर येऊन सुहास वसंतराव मोरे (रा. सप्तशृंगी देवी मंदिराजवळ, डीजीपीनगर - 2) हे घराजवळ पायी चक्कर मारीत असताना त्यांच्या हातातील १४ हजार रुपयांचा मोबाईल बळजबरीने खेचून नेला.

याप्रकरणी शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने तपास करून संशयित यश पाटील यास ताब्यात घेतले़

Web Title:  Mobile thieves arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.