शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

विल्होळी परिसरात नेटवर्क मिळत नसल्याने मोबाईलधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 19:10 IST

विल्होळी : परिसरात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सर्वच मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. कॉल न लागणे, कॉल मध्येच बंद पडणे, समोरच्या व्यक्तीचा, आवाज ऐकू न येणे, फोन पे, गुगल पे अशा बिझनेस अ‍ॅप वापर करताना न येणे, इंटरनेट सेवेचा लाभ घेता येत नसल्याने मोबाईल धारकांनी संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देनेटवर्क शोधासाठी दूरवर कुठेतरी उंचावर जावे लागते.

विल्होळी : परिसरात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सर्वच मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. कॉल न लागणे, कॉल मध्येच बंद पडणे, समोरच्या व्यक्तीचा, आवाज ऐकू न येणे, फोन पे, गुगल पे अशा बिझनेस अ‍ॅप वापर करताना न येणे, इंटरनेट सेवेचा लाभ घेता येत नसल्याने मोबाईल धारकांनी संताप व्यक्त केला आहे.एकीकडे रिचार्ज चा दर वाढत असताना दुसरीकडे नेटवर्क मिळत नसल्याने पैसे देऊन मनस्ताप सहन करावा लागतो. सर्व कंपन्यांचे प्लॅन हे मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक, वार्षिक असल्यामुळे दिवस तर संपत आहे, परंतु सेवेचा लाभ घेता येत नसल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.इंटरनेट बंद असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरता येत नाही, ना कुठलेही प्रवेश पत्र डाऊनलोड करता येत नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षा, पदवी परीक्षा, सह शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. नेटवर्क शोधासाठी दूरवर कुठेतरी उंचावर जावे लागते. गावात सुरू असलेल्या बँका, कार्यालय मधील इंटरनेट, एटीएम सेवा यांचा बोजवारा उडाला आहे.यामुळे नागरिकांची कामे खोळंबत असल्याने कर्मचारी व नागरीकांमध्ये वाद होत आहे. त्यामुळे नागरिकांचे दैनिदन व्यवहार ठप्प झाले. संबंधित कंपन्यांनी नेटवर्क तात्काळ तोडगा काढण्याची मागणी मोबाईलधारकांनी कडून केली जात आहे.

टॅग्स :InternetइंटरनेटMobileमोबाइल