शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

मनसेत नाराजी सत्र सुरूच

By admin | Updated: July 21, 2014 01:06 IST

मनसेत नाराजी सत्र सुरूच

संजय शहाणे   इंदिरानगर पक्षातील संघटनात्मक फेरबदलानंतर मनसेचे प्रदेश सरचिटणीस आमदार वसंत गिते यांचे नाराजी नाट्य गेल्यावेळी गाजले असताना आता त्या रांगेत एका नगरसेवकाची भर पडली आहे. इंदिरानगर येथील नगरसेवक सतीश सोनवणे यांनी नाराजीतून पक्ष आणि पक्षनेत्यांचे बॅनर उतरविले आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर घेतलेल्या झाडाझडतीत सोनवणे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे ते व्यथित असल्याचे वृत्त आहे.युनिक गु्रप आॅफ इंदिरानगरच्या माध्यमातून काम करणाऱ्या सतीश सोनवणे यांनी विविध उपक्रम राबविले. त्यातून त्यांना प्रभाग क्रमांक ५३ गेल्या मनपा निवडणुकीत मनसेची उमेदवारी मिळाली. ते निवडून आल्यानंतरही त्यांनी वेगवेगळे उपक्रम सुरू ठेवले. त्यानंतर आधी पूर्व प्रभाग सभापतिपदासाठी नंतर माघार घेण्यास सांगण्यात आले आणि त्यानंतर आता दोनच महिन्यांपूर्वी स्थायी समिती सदस्यपदासाठी त्यांना अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले होते. तसेच पुन्हा नेत्यांनी अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले. या घडामोडींमुळे सोनवणे यांनी पक्ष बैठकांना टाळण्यास सुरुवात केली. त्यानंतर आता तर त्यांनी भगवती चौकासह विविध ठिकाणी पक्षनेत्यांबरोबर असलेल्या आपल्या छबी काढून घेण्यास सुरुवात केली असून, त्या जागी केवळ युनिक ग्रुपचे फलक लावले जात असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.यासंदर्भात सोनवणे काहीही कारण देत असले तरी दीड महिन्यापूर्वी नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी सोनवणे यांना राष्ट्रवादीतील काही व्यक्तींचे संबंध तसेच गुन्हेगारांशी कथित संबंध या विषयावरून तासले होते. लोकसभा निवडणुकीत आपण निष्ठेने काम केल्याचे सोनवणे यांचे म्हणणे होते. हेच कारण सोनवणे यांच्या नाराजीमागे असल्याचे सांगितले जात आहे.