शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कर्मचारी स्वाइन फ्लूचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:02 IST

महापालिकेतील नगरसचिव विभागातील कर्मचाºयाचा स्वाइन फ्लूने बळी घेतला आहे. आतापर्यंत शहरात स्वाइन फ्लूमुळे एकूण ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये चार जणांचा मृत्यू शासकीय रुग्णालयात तर तब्बल ४३ जणांचा मृत्यू खासगी रुग्णालयात झालेला आहे.

नाशिक : महापालिकेतील नगरसचिव विभागातील कर्मचाºयाचा स्वाइन फ्लूने बळी घेतला आहे. आतापर्यंत शहरात स्वाइन फ्लूमुळे एकूण ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये चार जणांचा मृत्यू शासकीय रुग्णालयात तर तब्बल ४३ जणांचा मृत्यू खासगी रुग्णालयात झालेला आहे.महापालिकेमार्फत स्वाइन फ्लूबाबत जागृती केली जात असताना गुरुवारी (दि. ३१) महापालिकेतील कर्मचारी सुनील नामदेव पवार (४७) यांना स्वाइन फ्लूची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला. सुनील पवार यांना चारच दिवसांपूर्वी कुंठीत वेतनश्रेणी लागू होऊन त्यांना वरिष्ठ लिपिकपदी पदोन्नती मिळाली होती. मात्र, या पदोन्नतीचा आनंद त्यांना काळाने घेऊ दिला नाही. दरम्यान, आॅगस्ट महिन्यात शहरात स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ६० असून, मनपा हद्दीबाहेरील ४५ रुग्णही शहरातील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यात मनपा हद्दीतील चौघांचा तर हद्दीबाहेरील ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी ते आॅगस्ट २०१७ या कालावधीत मनपा हद्दीतील १६८ तर हद्दीबाहेरील १५० रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली. त्यात हद्दीतील १७ जणांचा तर हद्दीबाहेरील ३० जणांचा मृत्यू झालेला आहे. खोकला, घशात खवखव होणे, ताप व अंगदुखी ही स्वाइन फ्लूची प्राथमिक लक्षणे आहेत. सदर लक्षणे जाणवू लागल्यानंतर रुग्णांनी तातडीने टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे डोस घ्यावेत. सदर टॅमी फ्लूच्या गोळ्या या महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत.