शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

सिटूच्या त्रैवार्षिक अधिवेशनात विविध निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:02 IST

कामगार व जनतेची फसवणूक करून फसव्या राष्ट्रवादामुळे भाजपसारखे चुकीचे सरकार निवडून येत आहेत. ही फसवणूक जनतेच्या लक्षात आणून देण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र करून आगामी काळात सिटू जनतेचे लक्ष वेधण्यासाठी संघर्ष करणार आहे.

सातपूर : कामगार व जनतेची फसवणूक करून फसव्या राष्ट्रवादामुळे भाजपसारखे चुकीचे सरकार निवडून येत आहेत. ही फसवणूक जनतेच्या लक्षात आणून देण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र करून आगामी काळात सिटू जनतेचे लक्ष वेधण्यासाठी संघर्ष करणार आहे. या संघर्षाची सुरु वात दि.८ जानेवारीला देशव्यापी संपाने होणार असल्याचे सिटूचे प्रदेश सरचिटणीस एम. एच. शेख यांनी जाहीर केले.सिटू भवन येथील कॉ. दिलीप पाटीलनगर येथे आयोजित सिटूच्या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. शेख यांनी पुढे सांगितले की, मागील पाच वर्षांच्या काळात केंद्रातील भाजप सरकारने लाखो नोकऱ्या दिल्याचे सांगितले. प्रत्यक्षात लाखो कामगारांना बेरोजगार केले आहे. ही वस्तुस्थिती आहे. देशात साम्राज्यवाद वाढत आहे. मोदी सरकारकडून खोटा राष्ट्रवादाचा डांगोरा पिटविला जात आहे. खरे तर कामगार वर्गच खरा राष्ट्रवादी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सिटूचे उपाध्यक्ष सईद अहमद यांनीही मार्गदर्शन केले.अध्यक्षस्थानी सिटूचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे होते. व्यासपीठावर श्रीधर देशपांडे, भिवाजी भावले, अ‍ॅड. वसुधा कराड, संतोष गांगुर्डे, बी. टी. भामरे, योगेश अहिरे, देवीदास आडोळे, सिंधू शार्दूल, भागवत डुंबरे, संतोष काकडे, हिरामण तेलोरे, हरिभाऊ तांबे, तुकाराम सोनजे, सतीश खैरनार, संतोष कुलकर्णी, हर्षल नाईक, कल्पना शिंदे आदी उपस्थित होते.जानेवारीत देशव्यापी संप पुकारणारसमारोपाच्या भाषणात सिटूचे राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी सांगितले की, सद्यस्थितीतील अर्थव्यवस्था, जातीय व्यवस्था, धर्माचा प्रभाव, साम्राज्यवाद यावर निवडणुका जिंकल्या जात आहेत. या सर्व व्यवस्था संपविण्यासाठी संघटनेची पुनर्बांधणी करावी लागेल. त्यासाठी कामगारांना प्रशिक्षित करण्यासाठी धोरण आखले जाईल. कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी दि. ८ जानेवारी रोजी पुकारण्यात येणाºया संपात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिक