अल्पवयीन मुलावर प्राणघातक हल्ला

By Admin | Updated: May 4, 2017 00:54 IST2017-05-04T00:51:11+5:302017-05-04T00:54:40+5:30

अल्पवयीन मुलावर प्राणघातक हल्ला

Minor attack on minor child | अल्पवयीन मुलावर प्राणघातक हल्ला

अल्पवयीन मुलावर प्राणघातक हल्ला

नाशिक : तीन ते चार अल्पवयीन संशयितांनी एकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि़ १) रात्रीच्या सुमारास घडली़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव अविनाश वसंत जाधव (१६, नाना गायकवाड चाळ, नवनाथनगर, पेठ रोड) असे असून, त्याच्यावर पंचवटीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
चंद्रकला जाधव या मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात़ त्यांचा मुलगा अविनाशचे एका मिरवणुकीत तेथील तीन ते चार मुलांशी वाद झाले होते़ सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास या मुलांनी नवनाथनगरमधील साई मंदिरासमोर अविनाशला अडविले व कुरापत काढून डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केला़ (प्रतिनिधी)

Web Title: Minor attack on minor child