शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पारा थेट ५.१अंशावर : नाशकात थंडीचा कहर सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 14:11 IST

थंडीचा कडाका वाढल्याने दिवस-रात्र नागरिक अंगावर उबदार कपडे परिधान करुन ठेवणे पसंत करत आहेत. यावर्षी पर्जन्यमानाचे प्रमाण अल्प राहिले असले तरी थंडीचा कडाका मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अधिकच वाढला

ठळक मुद्दे बागायतदार थंडीच्या कडाक्यामुळे धास्तावले सर्दीपडशाचे रुग्ण वाढले कमाल तपमानही घसरले. ११ जानेवारी २०१७ रोजी ५.८ इतके नीचांकी तापमान

नाशिक : पंधरवड्यापासून नाशिककर कडाक्याची थंडी अनुभवत आहेत. किमान तपमानाचा पारा सातत्याने घसरत असल्यामुळे थंडीने शहरासह जिल्ह्यात कहर केल्याने नागरिक हैराण झाले आहे. शनिवारी (दि.२९) या हंगामातील सर्वाधिक नीचांकी ५.१ इतके किमान तपमान नोंदविले गेले. थंडीचा कडाका वाढल्याने दिवस-रात्र नागरिक अंगावर उबदार कपडे परिधान करुन ठेवणे पसंत करत आहेत.यावर्षी पर्जन्यमानाचे प्रमाण अल्प राहिले असले तरी थंडीचा कडाका मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अधिकच वाढला आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात किमान तापमानाचा पारा पाच अंशापर्यंत घसरला होता. ११ जानेवारी २०१७ रोजी ५.८ इतके नीचांकी तापमान त्या हंगामातील नोंदविले गेले होते; मात्र चालू वर्षी डिसेंबर अखेर पारा ५ अंशापर्यंत घसरला असून गेल्या वर्षाची नोंद मागे पडली असून ५.१ ही यावर्षी हंगामातील नीचांकी नोंद ठरली. उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरीचा परिणाम  वातावरणावर झाला आहे. त्यामुळे नाशिक गारठले असून निफाड तालुका गोठला आहे. द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणा-या नाशिकमधील बागायतदार थंडीच्या कडाक्यामुळे चांगलेच धास्तावले आहे.शुक्रवारी दिवसभर वातावरणात गारठा कायम होता. तसेच थंड वा-याचा वेगदेखील अधिक राहिल्यामुळे दिवसभर ऊन पडून न पडल्यासारखेच होते. परिणामी वातावरणात उष्मा निर्माण होऊ शकला नाही. सुर्यास्तानंतर पुन्हा थंड वारे अधिक वेगाने वाहू लागल्याने मध्यरात्रीपर्यंत थंडीचा कडाका अधिकच वाढला होता. शनिवारी पहाटे नागरिकांनी घरबाहेर पडणे पसंत केले नाही. परिणामी जॉगींग ट्रॅकवरील संख्या रोडावल्याचे चित्र पहावयास मिळाले. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता पेठरोडवरील हवामान केंद्राकडून निरिक्षण नोंदविण्यात आले असता किमान तापमानाचा पारा थेट ५.१ अंशावर घसरल्याची नोंद करण्यात आली. अधिक वेगाने वाहणाºया थंड वा-यामुळे कमाल तपमानही घसरले. २३.९ इतके कमाल तापमान नोंदविले गेले.सर्दीपडशाचे रुग्ण वाढलेथंडीचा वाढता कडाका नागरिकांना असह्य होऊ लागला आहे. वाढत्या थंडीच्या तीव्रतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. सरकारी-खासगी रुग्णालयांमध्ये सर्दीपडशे, थंडी-तापाचे रुग्ण पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी ऊबदार कपडे वापरण्यास प्राधान्य द्यावे. थंड खाद्यपदार्थ खाणे टाळावे. जास्त रसदार फळेदेखील आहारात खाऊ नये. पाणी उकळून प्यावे,अशा उपाययोजना शहरातील डॉक्टरांनी सुचविल्या आहेत.

टॅग्स :NashikनाशिकTemperatureतापमानweatherहवामान