शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

पारा ४१ अंशांवर

By admin | Updated: March 30, 2017 22:43 IST

येवला : गेल्या सात दिवसापासून येवल्याच्या तपमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. मंगळवारी पारा ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता.

पारा ४१ अंशांवर येवला : गेल्या सात दिवसापासून येवल्याच्या तपमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. मंगळवारी पारा ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. वाढत्या उन्हामुळे गेल्या आठ दिवसांपासून शहर व तालुक्यात मोठा उष्मा जाणवू लागला आहे. अंगाची लाही होण्यास सुरुवात झाली आहे. त्यापासून येवलेकरांनी सुटका करून घेण्यासाठी रसवंतीगृहे, लिंबू सरबतापासून ते आईस्क्रीम पार्लरपर्यंतच्या व टरबुजाच्या दुकानांमध्ये धाव घ्यायला सुरुवात केली आहे.मध्यंतरीच्या काळात ढगाळ वातावरणामुळे तपमान कमी झाले होते, परंतु सध्या पहाटे गारवा आणि दुपारी उष्मा अशी परिस्थिती होती. परंतु गेल्या सात ते आठ दिवसांपासून तपमानात चढउतार चालू आहे. उन्हाचा पारा अचानक वाढू लागल्याने येवलेकरांना उन्हाळ्याचा जोरदार तडाखा अनुभवायला मिळत आहे. लग्नाची खरेदी व बस्त्याची गर्दी हा अपवाद वगळला तर वाढत्या उन्हाचा परिणाम जाणवू लागल्याने घराबाहेर पडणे जिकिरीचे झाले आहे. दुपारच्या वेळी वर्दळ कमी झाली आहे. मागील वर्षी दुष्काळात मार्चअखेर पारा ४३ अंशांपर्यंत पोहोचला होता. यंदा त्या तुलनेत पारा दोन अंशाने कमी आहे. शहरात ठिकठिकाणी रसवंतीची दुकाने थाटली आहे. गरिबांचा फ्रीज (मातीचा माठ) आता सर्वत्र दिसत आहे. उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने डोक्याला पांढरे उपरणे बांधून अथवा टोपीचा वापर सुरू झाला आहे. तपमानाच्या चढउतारामुळे दवाखान्यात गर्दी वाढत आहे. शहरात उन्हाची तीव्रता वाढत आहे. भरदुपारी रस्त्यावर शुकशुकाट दिसत असून, प्रत्येकजण सावलीचा शोध घेताना दिसत आहे. सुदैवाने पाण्याची तीव्र टंचाई यंदा नाही. तर दुसरीकडे उन्हाने मात्र नागरिक त्रस्त झाले आहे. उन्हाचा पारा आता दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याने, सकाळी 10 वाजल्यापासूनच घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. परिणामी शहरातील सर्वच रस्त्यावर सकाळी 10 वाजेपासून दुपारी चार वाजेपर्यत अघोषित संचार बंदी अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे वाढत्याउन्हाचा आरोग्यावर परिणाम होत आहे. येवल्यात मंगळवारी पारा 41 अंशावर पोहचला. हे तापमान वाढून 43 पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.उष्म्यामुळे शीतपेयांच्या मागणीत वाढ झाली आहे. उन्हात अंगाची लाही लाही होत असताना घसा ओला करण्यासाठी शीतपेयांच्या ठेल्यांकडे धाव घेत आहेत. खाद्यविक्र ेत्यांचाही शीतपेयांच्या विक्र ीकडे अधिक कल असल्याचे दिसत आहे. लिंबू पाणी, नारळ पाणी, कोकम सरबत या आरोग्यवर्धक शीतपेयांपेक्षा उसाच्या रसाला नागरिकांची अधिक पसंती असल्याने रसाच्या दुकानात मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे. याशिवाय मिनरल वॉटर, बाटलीबंद शीतपेये व अन्य पेयांच्या मागणीत 40 टक्क्यÞांनी वाढ झाल्याचे एका विक्र ेत्याने सांगितले. मोसंबी, अननस आदी फळांच्या रसांनाही मोठी मागणी आहे. बच्चे कंपनी काला खट्टा, कच्ची कैरी, मिल्क शेक तसेच बर्फाचा गोळा खाण्यात मग्न असल्याचे चित्र दिसत आहे.