शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक येथील कुंभमेळा २०२७साठी 'मेगा प्लॅन'!, केंद्रीय अर्थसंकल्पातून मिळणार मोठा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 07:53 IST

Kumbh Mela Nashik: १ फेब्रुवारी रोजी संसदेत सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा-२०२७ आणि संबंधित प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद होण्याची शक्यता आहे. 

- हरीश गुप्ता नवी दिल्ली - १ फेब्रुवारी रोजी संसदेत सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा-२०२७ आणि संबंधित प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद होण्याची शक्यता आहे. 

केंद्र सरकार नाशिक विमानतळ, रेल्वेस्थानके, साधुग्राम (भाविकांसाठी निवारे), नदीकाठचा विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता वाढवणे इत्यादी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी निधी देण्याची योजना आखत आहे.

पर्यटन मंत्रालयाकडून मिळणारा निधी त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमधील पर्यटन विकासासाठी ‘प्रसाद’ आणि ‘स्वदेश दर्शन’ योजनांतर्गत दिला जाऊ शकतो. मंत्रालयाने कोपरगाव आणि शिर्डी येथील पर्यटन विकासकामांसाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत मंजुरी दिली आहे. रेल्वे, विमान वाहतूक आणि इतर मंत्रालयांनीही तेथील सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी निधी खर्च करण्याची योजना आखली आहे.

आगामी कुंभमेळा २०२७ च्या तयारीचे नियोजन, समन्वय आणि देखरेख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना केली आहे. हे प्राधिकरण कुंभमेळ्याचे सुरळीत आयोजन करण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून कार्य करते.

८ कोटींहून अधिक भाविक या मेळ्याला भेट देतील?अलीकडच्या वर्षांत धार्मिक पर्यटनाला लोकप्रियता मिळाल्याने, २०२७ मध्ये आठ कोटींहून अधिक भाविक या मेळ्याला भेट देतील अशी अपेक्षा आहे. वर्ष २०१५ मध्ये नाशिकमध्ये झालेल्या कुंभमेळ्यात सुमारे २.५० कोटी भाविकांनी सहभाग घेतला होता.

७,४१० कोटी रुपयांची रक्कम मंजूर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७ साठी प्राधिकरणाने सुरुवातीला ७,४१० कोटी रुपयांची रक्कम मंजूर केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसाठी २५,०५५ कोटी रुपयांच्या भव्य विकास बजेटला मंजुरी दिली आहे.नाशिक महानगरपालिका पाणी/सांडपाणी व्यवस्थापनासाठी ‘क्लीन गोदावरी म्युनिसिपल बॉण्डस्’ आणि ‘ग्रीन बॉण्डस्’द्वारे ४०० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nashik Kumbh Mela 2027: Mega plan with central funding expected.

Web Summary : Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela 2027 is set for a mega upgrade. The central budget is expected to allocate significant funds for infrastructure like airport, railway stations, and sanitation. Over 8 crore devotees are anticipated, with substantial investment planned for world-class facilities and tourism development.
टॅग्स :NashikनाशिकKumbh Melaकुंभ मेळा