शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला शिरीषकुमार कोतवाल समर्थकांची बैठक

By admin | Updated: September 16, 2014 23:44 IST

चांदवडला शिरीषकुमार कोतवाल समर्थकांची बैठक

चांदवड : गेल्या आठवड्यातमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मला कॉँग्रेस पक्षात प्रवेश करा, असा आग्रह केला; मात्र मी माझ्या चांदवड-देवळा मतदारसंघातील मित्र-कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याशिवाय मी प्रवेश करणार नाही. कारण गेल्या ३३ वर्षांपासून माझ्यावर मतदारांनी व कार्यकर्त्यांनी जे प्रेम केले त्यांना मी विसरू शकणार नाही, असे भावपूर्ण आवाहन चांदवड - देवळा मतदारसंघाचे आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी चांदवड येथे विधानसभा निवडणुकीचे कार्यकर्त्यांचे मनोगत व पुढील धोरण ठरविण्यासाठी आयोजित बैठकीत केले.बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अ‍ॅड. पोपटराव पवार होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार शांतारामातात्या अहेर, कृउबा समिती संचालक संजय जाधव, अ‍ॅड. विनायक घुले, दिलीप धारराव, बबनराव पूरकर, शंकरराव गांगुर्डे, पोपटराव उशीर, डॉ. विश्राम निकम, गणेश ठाकरे, प्रा.राजेंद्र सोमवंशी, हरिभाऊ शिंदे (हिवरखेडे), वाघचौरे, (तळेगावरोही) शरद गाढे, विनोद माळी, अशोक व्यवहारे, सरपंच विजय कोतवाल, जितेंद्र अहेर, विजय पगार आदिंची भाषणे झालीत. यावेळी बोलताना आमदार कोतवाल म्हणाले की, जनतेने दिलेले प्रेम व पाच वर्षात केलेली महत्त्वपूर्ण विकासकामे तसेच आघाडी सरकारने घेतलेले निर्णय यात मतदारसंघातील कांदा, डाळींब, टमाटा पिकांसाठी शेतकऱ्यांना न्याय या शासनाने दिला तर शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्जपुरवठा, वीजप्रश्नी ठोस निर्णय, सिंचनाचे प्रश्न, चांदवड - देवळा मतदारसंघात ग्रामपंचायतीना इमारती, स्मशानभूमीचा प्रश्न आदि महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले आहेत. अजूनही बरेच प्रश्न मार्गी लावायची आहेत. या करिता जनतेचे व कार्यकर्त्यांचे सहकार्य अपेक्षित आहेत. आतापर्यंत काही लोकांना भरपूर देऊनही ते काहीच मिळाले नाही असे म्हणून जर शेवटच्या क्षणी साथ सोडणार असेल तर हे बरोबर नाही. तडजोड विचाराशी करू नका तर बांधलकीशी तडजोड करा, असे सांगून माझ्या मनगटात धमक आहे व डोक्यात अक्कल आहे. याकरिता मला चांदवड मतदारसंघातील शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवायचा आहे, तर कोतवाल म्हणाले की, माझ्यापेक्षा आपणापैकी जर कोणी सक्षम उमेदवार असला तर मी थांबण्यास तयार आहे. त्याच्यासाठी मी तन-मन-धनाने प्रयत्न करीन हे कोतवाल बोलताच उपस्थितांनी सांगितले की, भाऊ तुम्हीच उभे रहा, असे सांगताच कोतवाल म्हणाले की, तुमच्या विश्वासावर मी उभा राहणार आहे व पुढे जाणार आहे. आपण यासंदर्भात मतदारसंघातील मोठ्या गावातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे आमदार कोतवाल यांनी सांगितले.बैठकीस माजी सभापती रामदास कोल्हे, चंद्रभान भालेराव, अशोक जाधव, अ‍ॅड. दिनकरराव ठाकरे, राजेंद्र गिडगे, मारुती भोकनळ, शिवाजी जाधव, मुन्नुभाई घासी, आझादभाई, चंद्रशेखर कासलीवाल, गुल्लुभाई घासी, अन्वर शहा, अशपाक खान, दीपक व्यवहारे, विजय सांबर, भाऊसाहेब शेलार, लक्ष्मण भुजार्डे, शिवाजी कासव, पोपटराव पगार, मनोहर पाटोळे, शांताराम घुले, सचिन अग्रवाल, मधुकर निंबाळकर, पुंजाराम ठाकरे, डॉ. संजय कोकणे, डॉ. संदीप देवरे, दिनकर कोतवाल, पोपटराव शेळके, उद्धव चौधरी, सुधाकर निकम, प्रकाश जैन, खंडेराव सोमवंशी, शिवाजी बर्डे आदिंसह चांदवड- देवळा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. (* वार्ताहर)