आरोग्य केंद्राला केंद्रीय पथकाची भेट

By Admin | Updated: November 11, 2016 23:44 IST2016-11-11T23:46:59+5:302016-11-11T23:44:26+5:30

आरोग्य केंद्राला केंद्रीय पथकाची भेट

A meeting of the central team at the health center | आरोग्य केंद्राला केंद्रीय पथकाची भेट

आरोग्य केंद्राला केंद्रीय पथकाची भेट

जायखेडा : येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रास कॉमन रिव्ह्युलेशन या दिल्लीच्या केंद्रित समितीने भेट देऊन येथील राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत चालणाऱ्या कामकाजाची पाहणी केली. या समितीचे ग्यानकुमार, सचिन भोसले, मुंबई आरोग्य संचलनालय श्री गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नीलेश सोनवणे, पंकज मोराणकर आदिंचा समावेश होता.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होते की नाही याची पहाणी करण्यासाठी व त्या संदर्भातील अडीअडचणी समजून घेण्यासाठी हे विशेष पथक येथे आले होते. या भेटीदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राची कामकाजाची पाहणी, अंतर्गत व बाह्य स्वच्छता, सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी कशाप्रकारे केली जाते याबाबत माहिती घेतली. सर्वसामान्य लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य विषयक सुविधा कशाप्रकारे दिल्या जातात व शासनाच्या योजनांचा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविल्या जातात की नाही याबद्दल
आरोग्य केंद्राचे अधिकारी, कर्मचारी व आशा कार्यकर्त्यांकडून तसेच रुग्णालयातील रुग्णांकडून माहिती जाणून घेतली.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार चोरडिया यांच्यासह येथील आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: A meeting of the central team at the health center