शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत बैठक

By admin | Updated: October 24, 2016 00:51 IST

महत्त्वपूर्ण निर्णय : मुंबई येथे मंत्रालयात ऊर्जामंत्र्यांची शिष्टमंडळाने घेतली भेट

नाशिकरोड : एकलहरे येथील प्रकल्पग्रस्त व कामगारांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक पार पडून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मंत्रालयात राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रधान सचिव बिपीन श्रीमाळी, कार्यकारी संचालक बोंद्रे यांच्यासोबत आमदार बाळासाहेब सानप व एकलहरा प्रकल्पग्रस्त कृती समितीची बैठक पार पडली. यावेळी एकलहरा प्रकल्पग्रस्त व कामगारांच्या प्रश्नाबाबत विविध विषयांवर चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.बैठकीमध्ये महानिर्मिती कंपनीच्या नव्याने निघणाऱ्या भरतीमध्ये प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींना ५० टक्के आरक्षण, बी.टी.आर.आय. विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये समावेश करून घेणे, प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींना ५८ वयापर्यंत कायमस्वरूपी सेवेत ठेवणे, आयटी आय उत्तीर्ण, चौथी, आठवी, दहावी, बी.कॉम., बी.एस्सी., डिप्लोमा, डीग्री उत्तीर्ण झालेल्या प्रगस्तग्रस्तांना आस्थापना, वित्त व इतर विभागात योग्य ते मानधनावर सेवेत सामावून घेणे, जे प्रकल्पग्रस्त आयटीआय प्रशिक्षण व १० वी उत्तीर्ण होणे शक्य नसेल त्यांना अर्धकुशल, कुशल प्रगत कुशलाप्रमाणे कार्यालयीन कर्मचारी, सिक्युरिटी इत्यादी ठिकाणी नेमणूक देण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला सरपंच दिनेश म्हस्के, भाजपा शहर उपाध्यक्ष प्रकाश घुगे, तानाजी गायधनी, बाजीराव भागवत, हेमंत गायकवाड, कृती समिती अध्यक्ष प्रशांत म्हस्के, रामदास डुकरे, प्रकाश राजोळे, अ‍ॅड. सोमनाथ बोराडे, शंकर बोराडे, नंदकिशोर बोराडे, गंगाधर धात्रक, अरुण कहांडळ, गणेश जाधव, महेश जगताप, गोरख राजोळे, सोमनाथ जाधव, दिलीप कहांडळ आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्याचा निर्णयप्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ-३ ची परीक्षा उत्तीर्ण होणार नाही अशा विद्यार्थ्यांना कंत्राटी कामगार म्हणून सेवेत समाविष्ट करून घेणे, महानिर्मिती कंपनीच्या वसाहतीमधील व प्रकल्प बाधीत गावातील विद्यार्थ्यांसाठी सीबीएससी इंग्रजी माध्यमाच्या शाळा स्थापन करणे, विशेष करून प्रकल्पग्रस्तांसाठी १००० जागा जानेवारी २०१७ मध्ये काढण्यात येणार असून, त्या सर्व जागेवर प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींना कंपनी कायद्यांतर्गत (कंत्राटी) कामगार कायदा लागू करून १५ ते १८ हजार पगारवाढ करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.