शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांपासून वैद्यकीय बिले लाल फितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 01:48 IST

एसटी कर्मचाऱ्यांना गंभीर आजारासाठी देय असलेली वैद्यकीय बिले सादर करूनही गेल्या तीन वर्षांपासून वैद्यकीय बिले अदा करण्यात आली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. नाशिक मंडळातील शंभरपेक्षा अधिक कर्मचाºयांची बिले मुंबईतील मुख्यालयात अडकून पडली आहेत.

नाशिक : एसटी कर्मचाऱ्यांना गंभीर आजारासाठी देय असलेली वैद्यकीय बिले सादर करूनही गेल्या तीन वर्षांपासून वैद्यकीय बिले अदा करण्यात आली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. नाशिक मंडळातील शंभरपेक्षा अधिक कर्मचाºयांची बिले मुंबईतील मुख्यालयात अडकून पडली आहेत. बिले मंजूर करणाºया डॉक्टरांची अपुरी संख्या आणि महामंडळाकडे पुरेसा निधी नसल्याने बिले देण्यास विलंब होत असल्याचे बोलले जात आहे.राज्य परिवहन महामंडळाकडून कर्मचाºयांना पुरविण्यात येणाºया वैद्यकीय सुविधेमध्ये साध्या आणि गंभीर आजारासाठी बिले अदा केली जातात. यासाठी महामंडळाने वैद्यकीय दर निश्चित केलेले असून, स्थानिक पातळीवर वैद्यकीय अधिकाºयांच्या मंजुरीनंतर बिले दिली जातात तर गंभीर आजाराची बिले ही मुंबईतील मुख्यालयात पाठविली जातात. यामध्ये अपघातापासून ते शस्त्रक्रिया आणि डेंग्यूसारख्या आजारावर खर्च झालेली रक्कम महामंडळाकडून नियमानुसार दिली जातात; परंतु अशा प्रकारची वैद्यकीय बिले गेल्या तीन वर्षांपासून मुंबईत पडून असून, सदर बिले अद्यापही अदा करण्यात आलेली नाही. केवळ नाशिक मंडळातील ही बिले नसून राज्यातून अनेक विभागीय मंडळातील कर्मचाºयांची बिले मुख्यालयात अडकून पडली आहेत. कर्मचाºयांना वैद्यकीय कारणासाठी स्थानिक पातळीवर देखील वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आलेली आहे.निधी नसल्याने दिरंगाईमहामंडळाच्या खात्यामध्ये पुरेसा निधी नसल्यामुळे कर्मचाºयांना बिले अदा करण्यास विलंब होत असल्याची चर्चा आहे. काही कर्मचाºयांची वैद्यकीय बिले देण्यात आली; मात्र महामंडळाच्या खात्यामध्ये पैसेच नसल्याने काहींचे धनादेश परत पाठविण्यात आल्याचीही चर्चा महामंडळात सुरू आहे. मुंबईत महामंडळातील डॉक्टर्स हे केवळ एका तासासाठी उपलब्ध होत असल्याने त्या काळातच बिलांची फाईल उघडली जाते. त्यामुळे कामाचा वेग अतिशय कमी असल्यामुळे दिरंगाई होत असल्याचीदेखील चर्चा आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीयstate transportएसटी