मांस घेऊन जाणारा ट्रक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 12:06 AM2020-07-06T00:06:28+5:302020-07-06T00:07:06+5:30

महामार्गावर नाशिककडून मुंबईकडे तीन हजार किलो मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पाथर्डी फाट्याजवळ पुलावर अज्ञात व्यक्तींनी अडवून टेम्पोचालकाला मारहाण करून टेम्पो अंबड पोलीस ठाणे येथे जमा केला. अंबड पोलिसांनी तीन हजार किलो मांस व टेम्पो जप्त केला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी टेम्पोचालक, क्लिनर व त्यांना मारहाण करणारे अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.

Meat truck confiscated | मांस घेऊन जाणारा ट्रक जप्त

मांस घेऊन जाणारा ट्रक जप्त

Next

सिडको : महामार्गावर नाशिककडून मुंबईकडे तीन हजार किलो मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पाथर्डी फाट्याजवळ पुलावर अज्ञात व्यक्तींनी अडवून टेम्पोचालकाला मारहाण करून टेम्पो अंबड पोलीस ठाणे येथे जमा केला. अंबड पोलिसांनी तीन हजार किलो मांस व टेम्पो जप्त केला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी टेम्पोचालक, क्लिनर व त्यांना मारहाण करणारे अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस हवालदार धनंजय दोवाडे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. महामार्गावर द्वारकाकडून आयशर टेम्पोचालक अलताफ शेख हे (एमएच १५, जीव्ही १५०१) मध्ये जनावरांचे तीन हजार किलो मांस घेऊन शनिवारी रात्री मुंबईकडे जात होते. यावेळी महामार्गावरील पुलावर पाथर्डीफाटाजवळ अज्ञात व्यक्तींनी टेम्पो अडवला. टेम्पोचालक व क्लिनर यांना मारहाण करण्यास सुरु वात केल्यावर दोघेही टेम्पो सोडून पळून गेले. अज्ञात व्यक्तीने आयशर टेम्पो अंबड पोलीस ठाणे येथे लावून निघून गेले. यानंतर टेम्पोचालक अंबड पोलीस ठाणे येथे आले. यावेळी त्यांनी अज्ञात व्यक्तींकडून आम्हाला मारहाण केल्याची तक्र ार दिली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी आयशर ट्रक व मांस जप्त करून टेम्पोचालक अलताफ शेख (४२,रा. जुने नाशिक) क्लिनर नदीम कुरेशी (२३) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. पोलिसांनी त्यांना रविवारी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. तसेच टेम्पोचालक शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एस. आर. धरम करीत आहेत.

Web Title: Meat truck confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.