शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

नात्यागोत्यातील लढती बनल्या लक्षवेधी

By admin | Updated: November 13, 2016 23:50 IST

सटाणा : राजकारणामुळे आप्तस्वकीयांमध्ये राजी-नाराजी

सटाणा : शहरातील प्रभाग २ मधील निवडणूक नात्यागोत्यातील लढतीमुळे लक्षवेधी ठरत आहे. भाजपाच्या पुष्पा सूर्यवंशी व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सुशीलाबाई रौंदळ या दोन्ही विहिणींमध्ये खुर्ची मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.प्रभाग २ हा सर्वसाधारण महिला व ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर पालिका सभागृहात प्रवेश करणाऱ्या विद्यमान नगरसेवक सुशीलाबाई रौंदळ यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये पक्षांतर करून साडेतीन महिने या आउट घटकेचे नगराध्यक्षपद मिळविले. त्यानंतर त्याच पक्षात रमल्याने त्यांनी यंदा त्याच पक्षाकडून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या समोर त्यांच्या विहीण पुष्पा सूर्यवंशी यांनी आव्हान उभे केल्याने त्यांची पंचाईत झाली आहे. या प्रभागात दोघांचे मोठे नातेगोते आहे. सूर्यवंशी यांचे पती सेवानिवृत्त अधिकारी जे. टी. सूर्यवंशी यांचाही दांडगा जनसंपर्क आहे. रौंदळ यांची भाची सूर्यवंशी परिवारात म्हणजे सूर्यवंशी यांची स्नुषा विशेष म्हणजे रौंदळ यांच्या घरातच त्यांचे बालपण गेलेले. मुलगा, सून दोघेही नामवंत डॉक्टर आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका रौंदळ यांच्या सुशीलाबाई काकू या नात्यागोत्याच्या गुंतागुंतीमुळे ही लढत लक्षवेधी ठरणार आहे. या प्रभागातून सेनेच्या ज्योती कर्डिवाल, शहर विकास आघाडीच्या मंगला सोनवणे लढत देत आहेत. सोनवणे या वतनदार, तर कर्डिवाल या बेलदार समाजाच्या आहेत. बांधकाम व्यवसायामुळे कर्डिवाल यांचाही चांगला संपर्क आहे. एकंदरीत या प्रभागात चौरंगी लढत असून, तीन मराठ्यांच्या आदळ आपटमध्ये कर्डिवाल यांना किती फायदा होतो हे काळच ठरवेल. याच प्रभागातील दुसरी जागा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहे.या जागेसाठी भाजपाकडून महेश देवरे, कॉँग्रेसकडून किशोर कदम, राष्ट्रवादीकडून दत्तू सोनवणे, सेनेकडून राजेंद्र बारकू सोनवणे तर शहर विकास आघाडीकडून वैभव सोनवणे निवडणूक लढवित आहेत. (वार्ताहर)