पक्षादेश झुगारणाऱ्यांवर कारवाई करू : मौलाना इस्माईल

By Admin | Updated: November 27, 2014 23:48 IST2014-11-27T23:26:58+5:302014-11-27T23:48:07+5:30

पक्षादेश झुगारणाऱ्यांवर कारवाई करू : मौलाना इस्माईल

Maulana Ismail | पक्षादेश झुगारणाऱ्यांवर कारवाई करू : मौलाना इस्माईल

पक्षादेश झुगारणाऱ्यांवर कारवाई करू : मौलाना इस्माईल

 मालेगाव : मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी तिसरी आघाडी व मित्रपक्षांतर्फे इब्राहीम हाजी मो. यासीन हे उमेदवार असून, गटनेते नरेंद्र सोनवणे असतील. व्हिपचे उल्लंघन करणाऱ्या नगरसेवकांवर निलंबनासाठी कठोर कारवाई करेल असे तिसरी आघाडीचे पक्षाचे प्रमुख माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पत्रकार परिषदेत मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, नरेंद्र सोनवणे, हाजी इब्राहीम नॅशनलवाले बोलत होते. त्यांनी तिसरी आघाडीच्या गटनेत्याबाबत भूमिका स्पष्ट केली. मोहंमद हाजी इब्राहीम नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी १९ नोव्हेंबर रोजी नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे तिसरी आघाडी पक्षाचा गटनेता कोण अशी विचारणा करणारे पत्र पाठविले होते. महापालिकेतील २३ नगरसेवकांनी तिसऱ्या आघाडीचा गटनेता म्हणून नरेंद्र सोनवणे यांची निवड केल्याचे प्रस्तावित केले आहे. तसेच २ जून २०१२ चे पत्रान्वये कळविण्यात आल्याचे विभागीय आयुक्तांनी २५ नोव्हेंबर रोजी कळविले आहे. सोनवणे गटनेते असून ते महापौर निवडीसाठी २३ नगरसेवकांना व्हीप बजावतील. त्यांच्या आदेशाचे सर्व नगरसेवकांनी पालन करावे, पक्षादेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असेही मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी सांगितले.

Web Title: Maulana Ismail