माथाडी कामगारांचा जिल्हा मेळावा उत्साहात

By Admin | Updated: October 26, 2016 23:08 IST2016-10-26T23:05:54+5:302016-10-26T23:08:01+5:30

मालेगाव : व्यापाऱ्यांच्या संपामुळे समस्यांचा सामना

The Mathadi workers gathering district rally | माथाडी कामगारांचा जिल्हा मेळावा उत्साहात

माथाडी कामगारांचा जिल्हा मेळावा उत्साहात

मालेगाव : येथील कृउबा आवारात माथाडी कामगारांचा जिल्हा मेळावा उत्साहात संपन्न झाला.
प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे उपस्थित होते. यावेळी भुसे म्हणाले, माथाडी कामगारांच्या समस्या सोडविण्याबरोबरच बाजार समिती आवारात उत्कृष्ट दर्जाचे माथाडी भवन साकारण्यासाठी प्रयत्न करू. याप्रसंगी आमदार पाटील यांनी लेव्हीमुळे कामगारांचा बोनस, फंड अडकला असून, हा प्रश्न सोडविण्यासह भुसे यांनी जिल्ह्यातील माथाडी कामगारांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. व्यापाऱ्यांच्या संप काळात हमाल-माथाडी कामगारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागल्याचे सांगून त्यांनी विविध समस्या मांडल्या. आमदार नरेंद्र पाटील, बाजार समिती सभापती प्रसाद हिरे, उपसभापती सुनील देवरे, मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष राजेंद्र पोटे, संचालक संग्राम बच्छाव, संजय घोडके, भारत रायते आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हिरे, सुनील यादव, बाळकृष्ण कर्पे, गोरख सूर्यवंशी, अण्णासाहेब पोटे आदिंची यावेळी भाषणे झालीत. संचालक वसंत कोर यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)

Web Title: The Mathadi workers gathering district rally