शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
4
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
5
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
6
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
7
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
8
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
9
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
10
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
11
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
12
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
13
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
14
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
15
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
16
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
17
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
18
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
19
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
20
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाणा येथे मातंग समाज मेळावा

By admin | Updated: January 8, 2017 00:55 IST

ज्ञानेश्वर काळे : पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती सुरूच

सुरगाणा : तंत्रज्ञानाच्या युगातही ग्रामीण भागातील मातंग समाजबांधवांना पोटाची खळगी भरण्यासाठी जंगलात वणवण फिरावे लागते, हेच या समाजाचे दुर्दैव असल्याचे प्रतिपादन मातंग समाज जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी केले.
सुरगाणा येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष यशवंत शिरसाठ, तर प्रमुख अतिथी म्हणून महाबँकेचे सदाशिव पाटील, एस. सी. चव्हाण, पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, नगराध्यक्ष रंजना लहरे, उपनगराध्यक्ष सचिन आहेर, नगरसेवक सुरेश गवळी, ज्ञानेश्वर कराटे, नगरसेवक शोभा पिंगळे, शेवंता वळवी, दिनकर पिंगळे, प्रकाश वळवी, शांताराम पगारे, मोहन रंजवे, सुरेश साबळे, तालुका अध्यक्ष निवृत्ती गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
काळे पुढे म्हणाले की, मागासवर्गीयांसाठी शासन विविध योजनांबाबत घोषणा करते; मात्र त्या तळागाळातील जनतेपर्यंत खरंच पोहचतात काय, हा प्रश्नच आहे.
दरम्यान, महाबँकेचे सदाशिव पाटील यांनी गुरुकुल प्रशिक्षण, व बँकेकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना देऊन कर्जफेडीबाबतच्या काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, अशोक साळवे, शांताराम पगारे, चंद्रकांत आल्हाड यांनीही मनोगत व्यक्त केले. नगराध्यक्ष रंजना लहरे यांनी मातंग समाजबांधवांची घरे त्यांच्या नावे करून देण्याबरोबरच गावाच्या संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रायोगिक तत्त्वावर लाभार्थींना कर्ज प्रकरण फॉर्मचे वाटप करण्यात आले. यशवंत शिरसाठ यांनी स्त्री शिक्षणाची आस धरून मुलींना जास्तीत जास्त शिक्षण देण्याचे आवाहन केले व ग्रामीण भागात प्रथमच आयोजित केलेला मेळावा यशस्वी केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. (वार्ताहर)