नाशिकमध्ये प्लास्टिक गोदामाला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 13:33 IST2018-12-07T13:33:30+5:302018-12-07T13:33:41+5:30
नाशिक येथील वडाळा गाव मधील सादिक नगर भागात असलेल्या प्लास्टिक भंगार मालाच्या गोदामाला भीषण आग लागली.

नाशिकमध्ये प्लास्टिक गोदामाला भीषण आग
नाशिक - नाशिक येथील वडाळा गाव मधील सादिक नगर भागात असलेल्या प्लास्टिक भंगार मालाच्या गोदामाला भीषण आग लागली. शुक्रवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, आगीचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. तरी देखील मोठ्या प्रमाणात गोदामाचे नुकसान झाले आहे. घटनास्थळाशेजारी दाट लोकवस्तीमुळे असल्यानं आगीवर नियंत्रणात मिळवण्यात अडथळे निर्माण होत आहेत. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.
सुमारे 25 जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. आगीने रौद्र धारण केला असता तर मोठा अनर्थ झाला असता मात्र अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होत आपले कार्य सुरू केले आहे. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे म्हटले जात आहे.