शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

नऊ मुस्लिम जोडप्यांचा सामूहिक विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:38 IST

दरवर्षी जानेवारी महिन्यात जुने नाशिक भागात युवा आदर्श या संस्थेकडून मुस्लिम समाजाचा सामूहिक विवाहसोहळा आयोजित केला जातो. यंदाचे हे ...

दरवर्षी जानेवारी महिन्यात जुने नाशिक भागात युवा आदर्श या संस्थेकडून मुस्लिम समाजाचा सामूहिक विवाहसोहळा आयोजित केला जातो. यंदाचे हे नववे वर्षे होते. रविवारी सकाळी ११ वाजता मोईन मियां यांच्या खास उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून खा. हेमंत गोडसे, आ. देवयानी फरांदे, शहर-ए- खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी, नगरसेवक समीना मेमन, सलीम शेख, मुशीर सय्यद, जेएमसीटीचे हाजी रऊफ पटेल, गुलजार कोकणी, अकरम खतीब आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी काजी हासिमोद्दीन यांनी धार्मिक पारंपरिक पध्दतीने निकाहचा विधी पार पाडला तर खतीब यांनी खास ‘खुतबा’ पठण केला. यावेळी ज्येष्ठ धर्मगुरु मोईन मियां यांनी दुवापठण करताना नववधू-वरांच्या भावी सौख्यभऱ्या वैवाहिक आयुष्यासाठी दुवा मागितली. तसेच समाजातील गरीब-श्रीमंतीची दरी कमी करण्यासाठी अशाप्रकारचे विवाह सोहळे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांनीसुध्दा विवाह अगदी साधेपणाने करण्याची शिकवण समाजाला दिली आहे, हे विसरुन चालणार नसल्याचे मोईन मियां यांनी सांगितले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष बबलू शेख यांनी केले. दरम्यान, नववधू-वरांना एकसमान संसारोपयोगी भेटवस्तूही देण्यात आल्या. तसेच आलेल्या सर्व वऱ्हाडींकरिता भोजनाचीही व्यवस्था केली होती.

---इन्फो--

वऱ्हाडींना सॅनिटायझर अन‌् मास्कचे वाटप

संस्थेच्या वतीने आलेल्या वऱ्हाडी मंडळींना मांडवामध्ये प्रवेश करताना सॅनिटायझर व मास्क दिले जात होते. बैठकव्यवस्थेतही अंतर राखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याचप्रमाणे थॅलेसेमियाग्रस्त मुलांसाठी यावेळी रक्तदान शिबीरही घेण्यात आले. यावेळी आलेल्या वऱ्हाडी मंडळींमधून तसेच संस्थेच्या काही कार्यकर्त्यांमधून रक्तदात्यांनी रक्तदान केले. दिवसभरात सुमारे ६० ते ६५ पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले.

----

फोटो आर वर : ३१मुस्लिम१ नावाने सेव्ह आहे.