अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:35 IST2021-01-13T04:35:11+5:302021-01-13T04:35:11+5:30

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील अरिंगळे मळा या भागात सहा संशयितांनी मिळून एका ...

Mass abuse of a minor girl | अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील अरिंगळे मळा या भागात सहा संशयितांनी मिळून एका १४ ते १६ वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुलीवर सामूहिकरित्या अत्याचार केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी उशिरा घडली. याप्रकरणी पीडितेने तिच्या आईकडे याबाबत सांगितले असता रात्रीच्या सुमारास आईने नाशिकरोड पोलिसांकडे धाव घेत घडलेला प्रकार कथन केला. यानुसार पोलीस उपायुक्त विजय खरात, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करून पथकाला त्यांच्या शोधात रवाना केले. मध्यरात्री उशिरापर्यंत पोलिसांनी एका अल्पवयीन संशयित मुलासह महिला व अन्य पाच युवकांना ताब्यात घेतले आहे. त्यांना रविवारी सकाळी न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. या घटनेचा सखोल तपास सुरू असल्याचे खरात यांनी सांगितले.

Web Title: Mass abuse of a minor girl