शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या निवडणुकीत अनेकांची अनामत जप्त

By admin | Updated: October 22, 2014 22:49 IST

विधासभा : मालेगाव बाह्य मतदारसंघाची परंपरा कायम

प्रवीण साळुंके ल्ल मालेगावयेथील मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीची परंपरा या निवडणुकीतही कायम राहिली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणूक रिंगणात असलेल्या १० पैकी विजयी उमेदवारांव्यतिरिक्त २ उमेदवारांची अनामत रक्कम वाचली असून, बाकीच्या ७ उमेदवारांची जप्त झाली आहे. २००९ साली झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत दाभाडी विधानसभा मतदारंसघाचे थोड्याफार फरकाने नव्याने नामकरण मालेगाव बाह्य मतदारसंघ असे झाले. या मतदारसंघात अनेक परंपरा असून, त्यातील अनेक काही परंपरा पूर्वीच्या दाभाडी मतदारसंघातही होत्या. त्यातील एक परंपरा म्हणजे पराभूत उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्याची आहे. यंदाच्या निवडणुकीत विधानसभेसाठी १० जणांनी नशिब अजमावले. विद्यमान आमदारांनी या सर्वांवर मात करत विजय मिळविला. त्यामुळे यातील सात उमेदवारांना आपली अनामत रक्कम गमाविण्याची नामुष्की आली. यात देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या कॉँगे्रसच्या उमेदवाराचा समावेश असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सलग दोन्ही निवडणुकीत आपले उमेदवार रिंगणात उतरविले मात्र, दोन्ही निवडणुकीत त्यांना आपल्या उमेदवाराची अनामत रक्कम गमाविण्याची वेळ आली. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीत दोन पराभूत उमेदवारांना स्वत:ची अनामत रक्कम वाचविण्यात यश आले. गेल्या निवडणुकीत फक्त एका उमेदवाराची अनामत रक्कम वाचली होती. २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाह्य मतदारसंघात एकूण १९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यातील पराभूतांमध्ये १७ जणांची अनामत रक्कम जप्त झाली होती. ही परंपरा पूर्वीच्या दाभाडी विधानसभा मतदारसंघातही सुरू होती. मतदारसंघाचा इतिहास बघता निवडणुकीत १९८५ सालापासून, झालेल्या विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत पराभूतांपैकी एक किंवा दोन जणांची सोडल्यास इतर उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. याला अपवाद १९९९ ची विधानसभा निवडणुक ठरली होती. या निवडणुकीत पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी दोघांची अनामत रक्कम वाचली होती तर दोघांची जप्त झाली होती.