शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडला गुरुपौर्णिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 00:48 IST

मनमाडला गुरुपौर्णिमा

मनमाड : शहर व परिसरात मंगळवारी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातील अनेक मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.येथून जवळच असलेल्या बोयेगाव येथील शिवटेकडीवर १४ वर्षे तपश्चर्येला बसलेल्या सोमेश्वरानंद महाराज यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त साधनागृहाबाहेर येऊन सूर्याला अर्ध्य दिले. यावेळी उपस्थित पंचक्रोशीतील भाविक व जनसमुदायाने त्यांना अभिवादन केले.मालेगाव रस्त्यावरील चोंडी येथील बोयेगाव टेकडीवर गुरुपौर्णिमेनिमित्त झालेल्या सत्संग साहेळ्यास भाविकांनी पहाटेपासुन मोठी गर्दी केली होती. पायी टेकडीवर आलेल्या हजारो स्त्री-पुरुष भाविकांच्या उपस्थितीत या वर्षीचा गुुरुपौर्णिमा उत्सव साजरा झाला. गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. हा उत्सव शहरात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. शहरातील शिवाजीनगर न.१ मधील श्रीसंत गजानन महाराज मंदिर, दत्तमंदिर, श्रीराम मंदिर, बालाजी विठ्ठल मंदिर, स्वामी समर्थ केंद्र कलावती आई परमार्थ निकेतन, वेशीतील विठ्ठल मंदिर, अनकवाडे शिवारातील श्रीसंत सदग्ुरू साईबाबा मंदिर, सुभाष रोडवरील श्री स्वामी समर्थ मंदिर, गजानन महाराज मंदिर आदि ठिकाणी गुरुपौणिमा उत्सव भक्तिभावाने साजरा झाला. अनकवाडे शिवारात संत सद्गुरु साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी झाली. साईबाबांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात येऊन विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. माजी नगराध्यक्ष राजाभाऊ छाजेड यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. गुरुपौणिमेनिमित्त शहरातील सर्वच मंदिरांत पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शिर्डी येथे उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या विविध पालख्या मनमाड शहरातून राज्य मार्गाने साईनामाचा गजर करत शिर्डीकडे मार्गस्थ झाल्या. शिर्डी येथे जाण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर बसस्थानकात गर्दी दिसून आली. (वार्ताहर)