राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या विद्यार्थ्यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 06:34 PM2019-11-08T18:34:09+5:302019-11-08T18:34:49+5:30

बोधगया येथे झालेल्या राष्ट्रीय युथ व ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथील खेळाडूंनी यश संपादन केले. त्यात प्राजक्ता खालकर हिने ६४ किलो वजनी गटात, निकिता काळे हिने ७१ किलो वजनी गटात, तर करु णा रमेश गाढे हिने ७६ किलो वजनी गटात कांस्यपदक प्राप्त केले.

Manmad students' success in national weightlifting competition | राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या विद्यार्थ्यांचे यश

राष्ट्रीय युथ व ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत यशस्वी झालेल्या खेळाडूंसमवेत प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे, प्रमोद आंबेकर, समाधान केदारे, प्रदीप वाघमारे, प्रवीण व्यवहारे आदी.

Next

मनमाड : बोधगया येथे झालेल्या राष्ट्रीय युथ व ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथील खेळाडूंनी यश संपादन केले. त्यात प्राजक्ता खालकर हिने ६४ किलो वजनी गटात, निकिता काळे हिने ७१ किलो वजनी गटात, तर करु णा रमेश गाढे हिने ७६ किलो वजनी गटात कांस्यपदक प्राप्त केले.
तसेच नूतन दराडे हिने ४९ किलो वजनी गटात सिल्व्हर मेडल आणि अनामिका शिंदे हिने ब्रांझ मेडल प्राप्त केले. सर्व यशस्वी खेळाडूंचा प्राचार्य डॉ. बी.एस. जगदाळे, उपप्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर, कुलसचिव समाधान केदारे यांनी सत्कार केला. शारीरिक शिक्षण संचालक प्रदीप वाघमारे व क्रीडा मार्गदर्शक प्रवीण व्यवहारे यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.

Web Title: Manmad students' success in national weightlifting competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.