मनमाडला राज्य सरकारचा निषेध; भाजपच्या वतीने वीजबिलांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:06 AM2020-11-24T00:06:02+5:302020-11-24T02:16:49+5:30

मनमाड : कोरोना महामारी आणि लॉकडाऊन त्यात आलेले वाढीव वीजबिल यामुळे सामान्य वीजग्राहक शेतकरी, व्यापारी व नागरिक त्रस्त झाले आहेत. आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष मनमानीने जनतेची दिशाभूल करून वीजबिलाचा बोजा सर्वसामान्य नागरिकांवर लादत आहेत. या निष्क्रिय महाविकास आघाडी राज्य सरकारच्या विरोधात मनमाड शहर भाजपच्या वतीने वीजबिलांची होळी करून आंदोलन करण्यात आले.

Manmad protests by state government; Holi of electricity bills on behalf of BJP | मनमाडला राज्य सरकारचा निषेध; भाजपच्या वतीने वीजबिलांची होळी

मनमाड येथे आंदोलनप्रसंगी नितीन पांडे, जयकुमार फुलवाणी, सचिन संघवी, सचिन लुणावत, उमाकांत राय, पंकज खताळ, एकनाथ बोडखे, नितीन परदेशी आदी.

Next
ठळक मुद्देनिष्क्रिय महाविकास आघाडी राज्य सरकारच्या विरोधात मनमाड शहर भाजपच्या वतीने वीजबिलांची

मनमाड : कोरोना महामारी आणि लॉकडाऊन त्यात आलेले वाढीव वीजबिल यामुळे सामान्य वीजग्राहक शेतकरी, व्यापारी व नागरिक त्रस्त झाले आहेत. आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष मनमानीने जनतेची दिशाभूल करून वीजबिलाचा बोजा सर्वसामान्य नागरिकांवर लादत आहेत. या निष्क्रिय महाविकास आघाडी राज्य सरकारच्या विरोधात मनमाड शहर भाजपच्या वतीने वीजबिलांची होळी करून आंदोलन करण्यात आले.

जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी, सचिन संघवी, सचिन लुणावत, उमाकांत राय, पंकज खताळ, एकनाथ बोडखे, नितीन परदेशी अकबर शहा यांच्या नेतृत्वात मनमाड शहरातील एकात्मता चौक येथे राज्य सरकारविरोधी जोरदार घोषणा देऊन निषेध व्यक्त करीत वाढीव बिलांची होळी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते कांतिलाल लुणावत, नीलकंठ त्रिभुवन, बुरहान शेख, मकरंद कुलकर्णी, जलील अन्सारी, अमित गोगड, डॉ. सागर कोल्हे, आशीष चावरिया, मनोज जंगम, आनंद काकडे, नारायण जगताप, दीपक पगारे, धीरज भाबड, प्रमोद जाधव, रूपेश लोढा आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Web Title: Manmad protests by state government; Holi of electricity bills on behalf of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.