शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
4
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
5
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
6
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
7
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
8
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
9
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
10
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
11
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
12
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
13
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
14
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
15
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
16
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
18
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
19
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
20
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावची मोसम नदी जुगाऱ्यांचा अड्डा

By admin | Updated: July 20, 2014 01:48 IST

मालेगावची मोसम नदी जुगाऱ्यांचा अड्डा

 

मालेगाव : येथील मोसम नदीची ओळख आता केवळ शहरातून वाहणारी गटारगंगा अशी राहिली नसून ती काटेरी झाडझुडपांआडील जुगाऱ्यांचा खुलेआम अड्डा झाली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी केवळ शहर- तालुक्यातील ग्रामीण भागातीलच नव्हे तर धुळे, चाळीसगाव या भागातीलही काही जुगारी आढळून येतात. मनपा प्रशासनाने नदीपात्रातील काटेरी झुडपांची साफसफाई करावी व पोलीस प्रशासनाने या जुगाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नदीकाठावरील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
मोसम नदी कॅम्प बंधारा ते झांजेश्वर अशी जवळपास किमान सहा किलोमीटर अंतर कापत शहरातून वाहत जाते. गेल्या २०-२५ वर्षांत ही नदी पावसाळा वगळता कधीही दुथडी भरून वाहिलेली नाही. या कालावधीत शहरातील केरकचरा व मलमूत्र वाहून नेणे असे गटारनाल्याचे स्वरूप या नदीस प्राप्त झाले आहे. नदीत गेल्या काही वर्षांत जागोजागी काटेरी झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. या काटेरी झाडेझुडपांच्या आधारे आणि नदीकाठालगत अतिक्रमित घरांच्या साहाय्याने अलीकडच्या काळात नदीपात्रात जुगार खेळणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. दिवस उगवल्यापासून संध्याकाळी उशिरापर्यंत नदीपात्रात ठिकठिकाणी अनेक जुगाराचे अड्डे सुरू असल्याचे दिसून येते. त्यात पत्ते व सारीपाटफेम चल्लसच्या आधारे जुगार खेळला जातो. अगदी चिल्लर रकमेपासून शेकडो रुपयांपर्यंत जुगार खेळला जातो. काही शालेय विद्यार्थ्यांनाही जुगाराचे व्यसन लागले आहे. खाऊसाठी अथवा शालोपयोगी साहित्य आणण्यासाठी दिलेले पैशांची अल्पवयीन विद्यार्थी जुगारात नासाडी करत असल्यामुळे चिंतेचा विषय झाला आहे. काही बेकार तरुण नोकरी-धंदा करून अर्थाजन करण्यापेक्षा जुगारातून पैसे कमावण्याच्या नादात असतात. काही खासगी नोकरदार-किरकोळ व्यावसायिकही या ठिकाणी जुगाराच्या माध्यमातून अधिक पैसे कमावण्याच्या नादात हजेरी लावतात.
जुगार खेळताना अल्पवयीन विद्यार्थी व तरुणांना गुटखा, तंबाखू, सिगारेट व दारूचे व्यसन लागते. या अड्ड्यातून जुगार खेळणारेच पुढे शहरातील विविध प्रकारच्या गुन्हेगारीत सामील असतात किंवा त्यास खतपाणी घालत जेणेकरून पुन्हा जुगाराचे अड्डे सुरू होणार नाहीत, अशी मागणी शहरातील व नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे.