शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या काळातही ‘जाहिरात’ टिकून

By admin | Updated: October 14, 2014 01:21 IST

बदलत्या काळातही ‘जाहिरात’ टिकून

 

राष्ट्रीय जाहिरात दिन साजरा होणे ही एक उत्साहवर्धक बाब आहे. यापूर्वी जाहिरात क्षेत्राने अशाप्रकारे एक ठरावीक दिवस निश्चित करून तो साजरा केला नव्हता.१४ आॅक्टोबर हाच राष्ट्रीय जाहिरात दिन म्हणून निवडण्याचे कारण म्हणजे या दिवशी १९०५ साली देशातील पहिली अ‍ॅड एजन्सी बी. दत्ता ऊर्फ दत्तात्रय बावडेकर यांनी मुंबई येथे सुरु केली.आजच्या काळात प्रत्येकजण जाहिरात संस्थांच्या द्वारे विविध माध्यमांच्या संपर्कात येत असतो. दुकानदार, कारखानदार, व्यावसायिक त्याचबरोबर वाढदिवसासाठी शुभेच्छा किंवा श्रद्धांजली इ.साठी वैयक्तिक जाहिराती देणारे तसेच जाहीर नोटीस देणारे अशा असंख्य प्रकारच्या ग्राहकांचा समावेश दिसून येतो. या जाहिरात दिनाच्या कार्यक्रमात अ‍ॅड एजन्सीज् रेडिओ, टीव्ही चॅनल त्याचप्रमाणे आऊट डोअर (होर्डिंग्ज्, वॉल पेंटिंग इ.) या सर्व माध्यमांत काम करणाऱ्यांचा सहभाग आहे. हे युग जाहिरातीेंचे युग आहे असे म्हटले जाते. स्पर्धात्मक जगात जाहिरातीला पर्याय नाही. त्यामुळे गेल्या पंचवीस वर्षांत जाहिरात क्षेत्राची घोडदौड खूप वेगाने झालेली दिसून येते. सोशल मीडियाद्वारे उत्पादनाची जाहिरात केली जाते; पण आजही या सर्वांमध्ये वृत्तपत्रीय जाहिरातींना ग्राहकाची प्रथम पसंती आहे. कमी खर्चिक, प्रभावी व अधिक काळ परिणाम करणारी असल्यामुळे वृत्तपत्र जाहिरात सर्वप्रथम केली जाते. नाशिकच्या दृष्टीने बघितले तर जाहिरात एजन्सीज् मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामध्ये छोट्या जाहिराती, जाहीर नोटीस यापासून ते मोठ्या क्रिएटिव्ह डिझाईन तयार करून त्या प्रसिद्ध करणाऱ्या अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज् कार्यरत आहेत. या जाहिरातदारांची संघटना नाशिक अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज् वेल्फेअर असोसिएशन (नावा) गत बारा वर्षांपासून कार्यरत आहे. ‘नावा’तर्फे वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये ‘नावा करंडक’ क्रिकेट स्पर्धा, सभासदांसाठी जाहिरात क्षेत्राशी संबंधित उद्बोधक व माहितीपर व्याख्याने, चर्चासत्रे, जाहिरात एजन्सीज्च्या कुटुंबीयांचे स्नेहसंमेलन इ. कार्यक्रम नियमित घेण्यात येतात. त्यामुळेच नाशिकमधील बहुतेक एजन्सीज्मध्ये सौहार्दाचे व खेळीमेळीचे वातावरण आहे. या कार्यांमध्ये वर्तमानपत्रांचे व संस्थेच्या हितचिंतकांचे, प्रायोजकांचे सहकार्य अनमोल आहे. आज राष्ट्रीय जाहिरात दिनाच्या निमित्ताने सर्व वृत्तपत्रे, हितचिंतक, जाहिरात एजन्सीज् ह्यांचे अभिनंदन आणि ज्यांच्यामुळे हा व्यवसाय वृद्धिंगत होत आहे त्या जाहिरातदार संस्था, व्यक्ती यांना शतश: धन्यवाद...- विठ्ठल देशपांडे