Maharashtra Accident: मुंबईवरून निघाले... कसाऱ्याजवळ मृत्यूने गाठले; कारचा भीषण अपघात, तिघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 11:48 IST2025-09-03T11:46:16+5:302025-09-03T11:48:14+5:30

Mumbai Nashik Highway Accident: मुंबईवरून नाशिकच्या दिशेने निघालेल्या कारचा भयंकर अपघात झाला. यात तिघांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले.

Maharashtra Accident: Leaving Mumbai Death near Kasara; Terrible car accident, three killed | Maharashtra Accident: मुंबईवरून निघाले... कसाऱ्याजवळ मृत्यूने गाठले; कारचा भीषण अपघात, तिघे ठार

Maharashtra Accident: मुंबईवरून निघाले... कसाऱ्याजवळ मृत्यूने गाठले; कारचा भीषण अपघात, तिघे ठार

Nashik Mumbai Highway Accident: मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जात असलेल्या एका कारचा भयंकर अपघात झाला. शहापूर तालुक्यातील कसाराजवळ मंगळवारी (२ सप्टेंबर) रात्री ही घटना घडली. यात दोन जण जागीच ठार झाले, तर एका व्यक्तीचा रुग्णालयात घेऊन जाताना मृत्यू झाला. कारमधील इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

कार मुंबईवरून निघाली होती. कारमध्ये पाच जण होते. मंगळवारी रात्री कसारातील ऑरेंज हॉटेल समोरून जात असतानाच कारचा अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या खड्ड्यात जाऊन पडली. 

वेगात असलेल्या कारचा या अपघातात पाठीमागच्या बाजूने चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि इतर कर्मचारी अपघातस्थळी आले. तातडीने त्यांनी कार बाजूला काढली आणि त्यातील जखमींना तातडीने रुग्णालयात नेले. 

तीन मृतदेह शवविच्छेदनासाठी खर्डी येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातामुळे वाहने थांबवल्याने वाहतूक कोंडीही झाली होती. मृत आणि जखमींची नावे अद्याप कळू शकलेली नाहीत. 

Web Title: Maharashtra Accident: Leaving Mumbai Death near Kasara; Terrible car accident, three killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.