शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कमी दाबाचा वीजपुरवठा

By admin | Updated: September 27, 2016 00:34 IST

शेतकरी संतप्त : सिंगल फेज योजना राबविण्याची मागणी

द्याने : वीज वितरण कंपनीकडून होणाऱ्या असंतुलित व कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना आपले वीजपंप सलग चालविता येत नाही तसेच पंप जळण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. काही भागात सिंगलफेज योजना कार्यान्वित न झाल्यामुळे शेतशिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. परिसरात सिंगल फेज योजना त्वरित राबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशा मागणीचे निवेदन वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.वीज वितरण कंपनीने ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे विजेचा पुरवठा होत नसून, विद्युतवाहक तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन विद्युत जणित्रावरील डी.ओ. जाणे, फ्यूज ना दुरुस्त होणे, डी.पी जळणे अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत आहेत. स्थानिक पातळीवर कोणत्याही प्रकारची तत्पर यंत्रणा नसल्यामुळे लोडशेडिंग संपल्यावरच संबंधित देखभाल व दुरूस्तीचे काम होते किंवा त्या कामाला दोन ते तीन दिवस विलंब होतो. यात सुधारणा होणे गरजेचे आहे, अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे, अशोक सावंत, नामदेव सावंत, संजय भामरे, दिनेश सावळा, बापू जगताप मधुकर कापडणीस, गिरीश भामरे, नितीन काकडे, सम्राट काकडे, शशिकांत कोर, योगेश बोरसे, विजय कोर, सुनील सोनवणे, योगेश मोरे, रविकांत कोर, योगेश पगार, नितीन मोरे, रोहिदास जाधव, विशाल मोरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)वीजजोडणी तत्काळ देण्याची मागणीतालुक्यातील अनेक गावांमध्ये ओव्हरलोड विद्युत जनित्र आहेत. ते अण्डरलोड करावेत. वितरण कंपनीच्या ‘मागेल त्याला वीजजोडणी’ या ब्रीदवाक्याप्रमाणे कंपनीने वंचित शेतकऱ्यांना तत्काळ वीजजोडणी देऊन दिलासा द्यावा. मुल्हेर सबस्टेशनच्या लोडशेडिंग वेळापत्रकातील बदलामुळे मजुरांना पिण्याचे पाणी भरण्यासाठी सकाळी ११ वाजेपर्यंत घरी थांबावे लागते. त्यामुळे रोजगार बुडून परिणामी त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर पूर्वीचेच वेळापत्रक ठेवावे, अशा उपरोक्त मागण्यांचे निवेदन वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता चंद्रसिंग इंगळे यांना देण्यात आले.