शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कमी दराने साखर विक्रीने ४४ लाखांचे नुकसान

By admin | Updated: July 31, 2014 00:52 IST

पिंगळेंचा आरोप : नासाका साखर विक्री प्रकरण

नाशिक : नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रावरील नासाका कर्मचारी पतसंस्थेने कारखान्याकडील थकबाकीपोटी सील केलेली साखरपोती बाजारभावापेक्षा कमी दराने विक्री करून कारखान्याचे तब्बल ४४ लाखांचे नुकसान केल्याचा आरोप नासाकाचे अध्यक्ष, माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी केला आहे.केवळ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वकील फी ५० हजार ते एक लाखाच्या आसपास देणे अपेक्षित असताना, ती तब्बल ५५ लाख रुपये देऊ केल्याने कारखान्याचे मोठे नुकसान कर्मचारी संघटना करीत असल्याचे पिंगळे यांचे म्हणणे आहे. २८ जुलै रोजी कारखाना पतसंस्थेने कारखान्याकडे थकीत असलेल्या रकमेपोटी जप्त केलेल्या २० हजार क्ंिवटल साखरेचा कोर्टाच्या प्रतिनिधींमार्फत टेंडरद्वारे कारखाना कार्यस्थळावर लिलाव केला. लिलावाकरिता घोेटी, त्र्यंबकेश्वर, नाशिकरोड येथील व्यापारी उपस्थित होते. लिलावात किमान २९०० रुपयांच्या पुढे बोली लावावी असे सांगितले असताना, प्रत्यक्षात व्यापारी व संबंधितांनी साटेलोटे करून २५०० पासून बोली लावून घोटी येथील व्यापारी गुलाबचंद श्रीश्रीमाळ यांना २८११ अशी बोली केली. संस्थेच्या सचिवांनी न्यायालयाचे प्रतिनिधी यांना सांगितले की, आपणास साडेपाच कोटी मिळतात, साखर देऊन टाका. प्रत्यक्षात कारखाना पतसंस्थेस केवळ एक कोटी १७ लाखांचेच देणे असताना ही साखर विक्री करून कारखाना डबघाईस आणण्याचे काम करण्यात आल्याचे पिंगळे यांचे म्हणणे आहे. २८ जुलै २०१४ रोजी एम-३० साखरेचा दर ३१०० रुपये असताना १२ हजार ७०० पोती साखर २८११ रुपये दराने विक्री करून नासाकाचे या कर्मचाऱ्यांनी ३६ लाख ७० हजारांचे नुकसान केले. (प्रतिनिधी)