शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

मित्रपक्षांच्या फाटाफुटीवर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 00:46 IST

शहरातील चारही मतदारसंघात युती आणि आघाडीचे उमेदवार रिंगणात असले तरी सर्वच पक्षांची नजर ही मित्रपक्षांच्या फाटाफुटीवर आहे, काही मतदारसंघात स्पर्धक उमेदवाराच्या पक्षांतर्गत नाराजीदेखील पथ्यावर पाडून घेण्याची स्पर्धा सुरू आहे.

ठळक मुद्देव्यूहरचना ; शहरी मतदारसंघातील राजकारणाला वेगळे वळण

नाशिक : शहरातील चारही मतदारसंघात युती आणि आघाडीचे उमेदवार रिंगणात असले तरी सर्वच पक्षांची नजर ही मित्रपक्षांच्या फाटाफुटीवर आहे, काही मतदारसंघात स्पर्धक उमेदवाराच्या पक्षांतर्गत नाराजीदेखील पथ्यावर पाडून घेण्याची स्पर्धा सुरू आहे.नाशिक शहरात चार मतदारसंघ आहेत. देवळाली मतदारसंघात शिवसेना आणि राष्टÑवादी कॉँग्रेस यांच्यात लढत आहे, तर नाशिक पूर्वमध्येदेखील भाजप आणि राष्टÑवादीत लढत आहे. नाशिक मध्य मतदारसंघात तिरंगी लढत आहे, तर पश्चिम नाशिक मध्य चौरंगी लढत असल्याचे सकृत दर्शनी दिसते आहे. नाशिक पूर्वमध्ये यंदा सर्वाधिक नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपच्या आमदाराचे तिकीट कापून ते मनसेतून ऐनवेळी आलेल्या उमेदवारास देण्यात आले तर भाजपचे आमदाराने मग राजीनामा देऊन तातडीने राष्टÑवादीचे घड्याळ हातावर बांधले. या घडामोडीत राष्टÑवादीच्या प्रयत्नातून मनसेच्या उमेदवाराने माघार घेतल्याची चर्चा असली तरी आघाडीची बिघाडी ठेवण्यात भाजपला यश आल्याचे सांगितले जात आहे. आघाडीत ही जागा कॉँग्रेसच्या वाट्याला आली असल्याने त्यांनी कवाडे गटाला सोडली होती. ऐनवेळी राष्टÑवादी कॉँग्रेसने उमेदवार उभे केल्यानंतर कवाडे गटाच्या उमेदवाराने माघार घेण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. अर्थात त्यामागे भाजपची खेळी असून, कॉँग्रेस आणि राष्टÑवादीत फूट पाडण्याची खेळी यशस्वी झाल्याचे दिसते आहे.नाराजी कॅश करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्नदेवळाली मतदारसंघात शिवसेना उमेदवाराला राष्टÑवादीने चांगले आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. तीस वर्षे एकाच घराण्यातील उमेदवार दिल्याने त्याविषयी अलीकडे उमटू लागलेली नाराजी कॅश करण्याचा राष्टÑवादीचा प्रयत्न आहे. विशेषत या मतदारसंघातील भाजपतील मैत्रीचा लाभ घेऊन मते मिळवण्याचा प्रयत्न पूर्वाश्रमीच्या भाजपच्या असलेल्या राष्टÑवादीच्या उमेदवाराने चालविला आहे, तर ऐनवेळी राष्टÑवादीने बाहेरून आलेल्या उमेदवाराला संधी दिली हेच निमित्त करून शिवसेनादेखील ही नाराजी पथ्यावर पाडून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत.मध्य नाशिक मतदारसंघात भाजपतील प्रबळ दावेदाराची संधी हुकल्यानंतर त्यांनी नाराजी कॅश करण्यासाठी कॉॅँग्रेस प्रयत्न करत असताना काँग्रेस उमेदवाराच्या विरोधातील गट मात्र मनसे किंवा भाजपच्या पथ्यावर पडणारा ठरू शकतो, असे विचार करून त्या दृष्टीनेच हालचालीदेखील सुरू आहे. मुळातच काँग्रेसमध्ये हा वाद खेळता राहील याची भाजपने दक्षता घेतली आहेच शिवाय राष्टÑवादीच्या डावलेल्या इच्छुकाकडूनदेखील रसद पुरवठा करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपा