शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
4
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
5
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
6
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
7
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
9
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
10
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
11
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
12
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
13
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
14
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
15
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
16
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
17
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
18
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
19
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
20
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
Daily Top 2Weekly Top 5

शाळेला ठोकले कुलूप...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 01:10 IST

घनसावंगी तालुक्यातील साकळगाव केंद्रांतर्गत असलेल्या घोेन्सी तांडा - २ येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाच्या नियुक्तीसाठी शालेय समिती, पालकांनी बुधवारी शाळेला कुलूप ठोकले

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील साकळगाव केंद्रांतर्गत असलेल्या घोेन्सी तांडा - २ येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाच्या नियुक्तीसाठी शालेय समिती, पालकांनी बुधवारी शाळेला कुलूप ठोकले. शिक्षक मिळेपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.घोन्सी तांडा - २ येथे जिल्हा परिषदेची इयत्ता चौथीपर्यंत दोन शिक्षकी शाळा आहे. या शाळेत दोन शिक्षकांची नियुक्ती आहे. येथे ८४ विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. दोनपैकी एक शिक्षकाची समायोजन अंतर्गत २० ते २५ दिवसापूर्वी बदली झाली. त्यामुळे एका शिक्षकांवर शाळेचा व विद्यार्थ्यांचा भार आला आहे. दुसऱ्या शिक्षकाच्या नियुक्तीसाठी शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने शालेय समिती अध्यक्ष राम राठोडसह भीमराव चव्हाण, नारायण राठोड, ज्ञानेश्वर राठोड, रामभाऊ आडे, विष्णू आडे, अंकुश राठोड, अर्जुन चव्हाण, स्थानिक पालक व ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास शाळेला टाळे ठोकले. संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत जोपर्यंत दुसरा शिक्षक मिळत नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.आमच्या शाळेत ८४ विद्यार्थी असून, सध्या या सर्वांना मी एकटा शिकवित आहे. शिक्षकाची रिक्त जागा भरावी, यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन केले. मागणी मान्य होईपर्यंत कुलूप उघडणार नसल्याचा ग्रामस्थांनी पवित्रा घेतल्याची माहिती वरिष्ठांना दिली आहे.-संदीप घालमाणे, मुख्याध्यापक

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षणTeacherशिक्षकagitationआंदोलन