शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन कर भरणाऱ्यांना पालिकेची घरपट्टी देयके!

By admin | Updated: September 8, 2016 01:13 IST

भुर्दंड : गो ग्रीन ऐवजी होऊ द्या खर्च

नाशिक : करदात्यांना महापालिकेची प्रतीक्षा न करताच आॅनलाइन कराचा भरणा करण्याची सोय करून प्रशासनाने एकीकडे पर्यावरणस्नेही भूमिका घेतली, मात्र दुसरीकडे कर भरणाऱ्या नागरिकांनाच दोन दोन महिन्यांनी पुन्हा देयके पाठविली जात आहेत. भरणा करण्याची रक्कम निरंक असली तरी आॅनलाइन कर भरण्यात सूट आणि वरून पुन्हा स्टेशनरीचा खर्च असे दुहेरी नुकसान पालिका स्वत:च करून घेत आहे.महापालिकेच्या वतीने संकेतस्थळ आणि आता अ‍ॅपवरूनही आॅनलाइन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिकेच्या वतीने घरपट्टीची देयके वाटण्यास विलंब होत असतो. त्याऐवजी नागरिकांनीच आॅनलाइन कर भरला तर पालिकेचा स्टेशनरी आणि मनुष्यबळाचा खर्च वाचेलच परंतु नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच उद्दिष्टापैकी मोठ्या प्रमाणात कर संकलन होऊ शकते, याचा विचार करून महापालिकेने आॅनलाइन कर भरणाऱ्यांना सूटही दिली आहे. त्यानुसार एप्रिल महिन्यात संकेतस्थळावरून स्वत: इंडेक्स नंबर टाकून घरपट्टी भरल्यास पट्टीत पाच टक्के आणि आॅनलाइन भरणा केल्याबद्दल एक टक्का अशी सूट दिली जाते. घरावर सौर ऊर्जा उपकरण असेल तर पालिका त्यासाठी अतिरिक्त पाच टक्के सूट देते. म्हणजे एप्रिल महिन्यात अशा करदात्याने भरणा केल्यास सहा टक्क्यांपासून अकरा टक्क्यांपर्यंत बिलात सूट मिळते. असाच मे आणि जून महिन्यात आॅनलाइन भरणा केल्यास तीन आणि दोन टक्के बिलात सवलत, तर आॅनलाइन भरल्याबद्दल एक टक्का सवलत मिळत असते. साहजिकच नागरिकांचे आॅनलाइन कर भरणा करण्याचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या हाती देयक नसताना नागरिक आॅनलाइन इंडेक्स नंबर टाकून घरपट्टी भरतात. मात्र, महापालिकेच्या वतीने तब्बल तीन ते चार महिन्यांनी देयकेही कर्मचारी वाटत आहेत. बिलावर समायोजन रक्कम निरंक दाखवली जात असली तरी येथे देयके देण्याचा प्रकार मात्र अनाकलनीय आणि पालिकेला भुर्दंड बसविणारा ठरत आहे.महापालिकेने कागदासाठी होणारी वृक्षतोड वाचविण्याच्या उद्देशाने आॅनलाइन बिल भरणा सुविधा दिली असली तरी देयक आॅनलाइनने भरल्यानंतर पुन्हा कागदावरील देयक दोन ते तीन महिन्यांनी देण्याची गरज काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे एका देयकासाठी पालिकेला स्टेशनरी बरोबरच मनुष्यबळाचाही खर्च होत असतो. तो वाचविला जात नसेल तर आॅनलाइनची सुविधा देऊन उपयोग काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)