शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

ललित साहित्यावर शाब्दिक जुगलबंदी

By admin | Updated: September 29, 2014 00:24 IST

परिसंवाद : ललित साहित्याच्या आवश्यकतेला कौल

नाशिक : जगण्याला भिडण्याची ताकद ललित साहित्यात आहे आणि ललित साहित्याशी समाजाचे नाते जन्मजन्मांतरीचे असल्याचा सूर ललित साहित्याचे समर्थक लावत असताना, ललित साहित्याची समाजाला तिळमात्र गरज नाही आणि खांडेकर-फडके वाचून सामान्य माणसाची दुपारची भूक काही भागणार नाही, असा हल्ला विरोधकांनी चढविला. सावानाच्या जिल्हा साहित्यिक मेळाव्यात रंगतदार ठरलेल्या परिसंवादात शाब्दिक जुगलबंदी झडल्यानंतर अध्यक्ष असलेल्या प्रा. दिलीप धोंडगे यांनी कास्टिंग व्होटचा वापर करत ललित साहित्याच्या बाजूने कौल दिला.सावानाच्या साहित्यिक मेळाव्यात डॉ. चंद्रकांत वर्तक स्मृती परिसंवादात ‘समाजाला ललित साहित्याची गरज नाही’ या विषयावर प्रा. अनंत येवलेकर, अभय सदावर्ते, डॉ. सतीश श्रीवास्तव, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे आणि प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी आपआपली मते मांडली. कवी किशोर पाठक यांनी समन्वयकाची भूमिका निभावली. प्रा. अनंत येवलेकर यांनी बीजभाषण करताना सांगितले, लालित्य हे ईश्वरासारखे असते. ते दाखवता येत नाही. जोवर फुलांना वास आहे तोवर ललित साहित्याची समाजाला गरज भासणारच आहे. जे खपले जात नाही, वाचले जात नाही म्हणून त्याची समाजाला गरज नाही, हे त्रैराशिक मांडले जाते ते तितकेसे खरे नाही. काही ललितकृती दिशाभूल करतात; पण जगण्याला भिडण्याची ताकद ललित साहित्यात आहे. अभय सदावर्ते यांनी बीजभाषकावरच प्रहार करत भुसभुशीत मांडणीवर आक्षेप घेतले. तुमची इयत्ता तपासून पहा, असा सल्लाही देण्यात आला. जे उत्स्फूर्त आहे ते नक्कीच वाचले जाईल. ललित साहित्याला कसलाही आधार नसल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सतीश श्रीवास्तव यांनी ललित साहित्याला अच्छे दिन आले असल्याचे सांगत त्याचे डबके झाले नसल्याचे स्पष्ट केले. प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनीही ललित साहित्य जगण्याला भिडत नसल्याचे सांगत नवे लेखनबंध विकसित करण्याची कल्पना मांडली. ललित लेखकाला कुणी किंमत देत नाही. त्यामुळे जे भावेल ते बेधडक लिहा, असेही बोऱ्हाडे यांनी सांगितले. याचवेळी शं. क. कापडणीस, अपर्णा वेलणकर, स्वानंद बेदरकर, सुनील देशपांडे, मिलिंद जहागीरदार व चंद्रकांत महामिने यांनीही चर्चेत सहभाग नोंदविला. परिसंवादाचा समारोप करताना प्राचार्य दिलीप धोंडगे म्हणाले, अवघा समाज हा साहित्योकुजीवी आहे. समाजाला संघटित करण्याचे आणि मूल्य टिकवून ठेवण्याचे काम साहित्य करत असते. साहित्य हे जगण्याची प्रबळ ऊर्मी, प्रेरणा निर्माण करते. ललितबंधातूनच ते उत्तम रीतीने प्रकट होते. ज्ञानेश्वरीतील ओव्या आणि तुकोबाच्या अभंगांचा आजही आधार घेतला जातो. ललित साहित्याचे सामर्थ्य त्यात आहे. साहित्य हे जीवनदर्शनाचे काम करते. त्यामुळे समाजाला ललित साहित्याची गरज असल्याचेही धोंडगे यांनी ठामपणे सांगितले. (प्रतिनिधी)