शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची छबी उजळविण्याची सुरुवात नाशिकमधून

By admin | Updated: September 8, 2016 00:57 IST

निमित्त आढावा बैठकीचे : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची मशागत

 श्याम बागुल ल्ल नाशिकजिल्हाधिकारी चांगले काम करतात, पण खालचे अधिकारी कामचुकार असल्याचा काढलेला निष्कर्ष, एकाच फटक्यासरशी ७२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करून ओढवून घेतलेली नाराजी, शेकडो महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रस्तावांना थेट विभागीय आयुक्तांकडे पाठवून सोयीच्या बदल्यांसाठी प्रयत्नशील असलेल्यांची केलेली गैरसोय अशा प्रशासनातील घडामोडींतून सनदी अधिकाऱ्यांमध्ये एकीकडे वचक निर्माण करण्याबरोबरच, दुसरीकडे जनसामान्यांसाठीच राज्य सरकार किती कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांशीही संवाद साधून विकास साधते अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी फडणवीस सरकारने आढावा बैठकीचे निमित्त साधले आहे.राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपा-सेना सरकारच्या कारकिर्दीस दोन वर्षे पूर्ण होण्यास जसा अल्पकाळ बाकी आहे, तशीच या सरकारच्या दोन वर्षाच्या कार्यकाळाचे मूल्यमापन खऱ्या अर्थाने करण्याची वेळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातूनदेखील अगदीच जवळ आली आहे. अशा परिस्थितीत सरकारची जनमानसातील प्रतिमा अधिकाधिक उजळ करून घेण्याचा भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या महत्त्वांकाक्षी योजनांपैकी असलेल्या व जनसामान्यांशी निगडित असलेल्या काही मोजक्याच योजनांचा आढावा घेण्याच्या निमित्ताने राज्याचा दौरा करण्याचे ठरविले व त्याची सुरुवात नाशिकच्या पुण्यभूमीतूनच होत आहे. राज्यातील प्रशासन व्यवस्था मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असली तरी, मंत्रालयात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले व विशेष करून ‘लॉबी’ करून असलेल्या सनदी अधिकाऱ्यांकडून अजूनही पाहिजे त्या प्रमाणात सरकारला साहाय्य मिळत नसल्याची खंत मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी चांगले काम करतात, पण त्यांच्या हाताखालचे अधिकारी काम करीत नाही अशी जाहीरपणे कबुली दिलेल्या मुख्यमंत्र्यांना नंतर जसे दुय्यम अधिकाऱ्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले, तसेच फडणवीस सरकारचा सरकारी यंत्रणेवर वचक नसल्याची राजकीय टीकाही झाली होती. अशातच एकाच फटक्यात ७२ वरिष्ठ आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे तर संपूर्ण प्रशासन यंत्रणेलाच हादरे बसून राजी-नाराजीचे प्रदर्शन झाले होते. सरकारची छबी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असल्याने बदल्यांमध्ये झालेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे सरकारचाच घटक असलेल्या यंत्रणा नाराज होऊन हाताबाहेर जाऊ नये म्हणून राज्यात पहिल्यांदाच खुद्द मुख्यमंत्र्यांना तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, प्रांत अधिकाऱ्यासमवेत आढावा बैठक घ्यावी लागत आहे. विभागातील नाशिक, नगर, धुळे, जळगाव व नंदुरबार या पाच जिल्ह्णांत ५५ तालुके असून, यातील प्रत्येक तालुक्याचा योजनानिहाय आढावा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा हे व्यावहारिक नसले, तरी आगामी काळात राज्यात नगरपंचायती, नगर परिषदा, महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार असून, त्याची आचारसंहिता जारी होण्यासही काही महिन्यांचाच अवधी आहे. या निवडणुकींना सरकार म्हणून सामोरे जाण्यापूर्वी प्रशासन व्यवस्थेवर वचक बसविणे तितकेच महत्त्वाचे आहे, शिवाय अशा बैठकांच्या माध्यमातून सरकारच्या योजना कोणत्या घटकांपर्यंत कितपत पोहोचल्या याचा अंदाज बांधणेही शक्य होणार आहे. त्यामुळे गुरुवारच्या बैठकीत सरकारी यंत्रणा कामांची आकडेमोड जाहीर करेन, पण त्यातून खरी मशागत होणार राज्यातील फडणवीस सरकारची !