न्याहरखेडे बुद्रुक शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

By Admin | Updated: November 27, 2014 23:18 IST2014-11-27T23:14:50+5:302014-11-27T23:18:32+5:30

समस्या : लेखी आश्वासनानंतर शालेय कामकाज सुरू

Lieutenant locks found by the villagers of Nyharkhade Budruk School | न्याहरखेडे बुद्रुक शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

न्याहरखेडे बुद्रुक शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

येवला : मुख्याधापकासह दोन उपशिक्षक मिळावे या मागणीसाठी तालुक्यातील न्याहरखेडे प्राथमिक उर्दू शाळेला शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी आज सकाळी कुलूप ठोकले. शाळेला शिक्षक मिळावा यासाठी पंचायत समिती गटशिक्षण अधिकाऱ्याकडे शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी मागणी केली होती.
शाळेला शिक्षक दिला नाही, तर २७ नोव्हेंबर रोजी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा न्याहरखेडे येथील समिती व ग्रामस्थांनी दिला होता. आठ दिवसाचा कालावधी उलटून ही गटशिक्षणाधिकारी यांनी त्या ठिकाणी शिक्षकाची नेमणूक न केल्याने संतप्त ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समितीने गुरु वारी सकाळी १० वाजता शाळेला कुलूप ठोकले. सायगावचे केंद्र प्रमुख म. का. चव्हाण व येवला उर्दू केंद्राचे अकबर शाह यांनी ग्रामस्थांची चर्चा करून आठ दिवसांत शिक्षक देण्याच्या लेखी आश्वासनाने पूर्ववत शालेय कामकाज सुरू झाले.
जावीर पठाण, सरपंच हुरखा मुलताणी, जाबीरखान हाफिज, मौलाना सुभान, मौलाना समध, लतीफ मुलतानी, हाजी हजीज, परविन अय्यूब मुलताणी, जुबेदा सरोज अल्लाखा पटेल, दीपक देवरे, श्रावण देवरे उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Lieutenant locks found by the villagers of Nyharkhade Budruk School