शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

चला, देश भ्रष्टाचारमुक्त करुया !

By admin | Updated: November 15, 2016 00:40 IST

वडांगळी : अधिकारी, शिक्षक, विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा निर्धार

सिन्नर : भ्रष्टाचार ही देशाला आणि पर्यायाने समाजाला लागलेली भयंकर कीड असून, या ‘कॅन्सर’ने संपूर्ण व्यवस्था पोखरली आहे. देशाच्या प्रगतीमध्ये मोठा अडथळा ठरणाऱ्या या भ्रष्टाचारापासून देशाला वाचविण्याची जबाबदारी तरुण पिढीची असून, त्यासाठी त्यांनी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन इंडिया सिक्युरिटी प्रेसचे निरीक्षक ए. के. गोविल यांनी केले. केंद्रीय सतर्कता आयोगाच्या वतीने साजऱ्या करण्यात आलेल्या सतर्कता सप्ताहाच्या निमित्ताने इंडिया सिक्युरिटी प्रेसने वडांगळी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. येथील ग्रीन व्हीजन कंपनीच्या सभागृहात पंचायत समिती सदस्य रामदास खुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास व्यासपीठावर सरपंच सुनीता सैंद, इंडिया सिक्युरिटी प्रेसचे सहायक प्रबंधक अर्पित धवन, भूषण कुलकर्णी, भरत वाल, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक खुळे, उत्तम कुलथे, नितीन अढांगळे, किशोर खुळे, पोपट सैंद, ग्रामसेवक शेषराव धीवर आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रीन व्हिजनचे संचालक नितीन अढांगळे यांनी मनोगत व्यक्त केले. न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य शरद रत्नाकर यांनी यावेळी बोलताना सतर्कता आयोगाचे बोधचिन्ह ‘बहिर्गोल भिंगाच्या रुपातील उघडा डोळा’ याकडे उपस्थितांचे लक्ष वेधत आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, व्यवहार याकडे उघड्या डोळ्यांनी व बारकाईने लक्ष देऊन जागल्याची भूमिका बजवावी, असे आवाहन केले. स्पर्धेत यशस्वी झालेल्या साक्षी तिडके (प्रथम), तेजस मवाळ (द्वितीय), काजल चव्हाणके (तृतीय) यांना अनुक्रमे एक हजार पाचशे, एक हजार व आठशे रुपये रोख स्वरुपात देण्यात आले. त्याचबरोबर प्रज्ञा चव्हाणके, शुभांगी कोकाटे, माधुरी खुळे, उत्कर्ष दंडगव्हाळ यांना प्रत्येकी सातशे रुपयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक देवून गौरविण्यात आले. अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना व उपस्थित ग्रामस्थांना भ्रष्टाचारविरोधी शपथ दिली. भरत वाल यांनी प्रास्ताविक केले. बाबासाहेब कलकत्ते यांनी सूत्रसंचालन केले. सतीमाता संस्थानचे विश्वस्त रमेश खुळे यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)