शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
3
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
4
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
5
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
6
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
7
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
8
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
9
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
10
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
11
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
12
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
13
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
14
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
15
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
16
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
17
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
18
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
19
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
20
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
Daily Top 2Weekly Top 5

‘एलईडी’ची चौकशी लटकली

By admin | Updated: September 7, 2016 00:40 IST

महापालिका : महापौरांच्या स्वाक्षरीमुळे अडला ठराव

 नाशिक : वादग्रस्त ठरलेल्या ‘एलईडी’ ठेकाप्रकरणी दीड महिन्यापूर्वी झालेल्या महासभेत सदस्यांनी तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांच्यावरही शरसंधान साधत थेट सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यावेळी महापौरांनी याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले होते. परंतु दीड महिना लोटला तरी अद्याप महासभेकडून चौकशीचा ठराव प्रशासनाला प्राप्त न झाल्याने ‘एलईडी’ प्रकरण पुन्हा एकदा लटकले आहे. शहरात अस्तित्वात असलेले पथदीप काढून बीओटी तत्त्वावर एलईडी फिटिंग बसविण्याच्या कामात झालेल्या अनियमिततेबद्दल तत्कालीन उपअभियंता नारायण गोपाळराव आगरकर यांची विभागीय चौकशी करण्यासंबंधीचा प्रस्ताव २० जुलै रोजी झालेल्या महासभेत मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. त्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्यांनी वादग्रस्त एलईडीबाबत सखोल चौकशीची मागणी लावून धरली होती. त्यावेळी चर्चेत तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांनाही सदस्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. अपक्ष गटनेते संजय चव्हाण यांनी खंदारे यांच्याकडून झालेल्या चुकीच्या कामकाजाबद्दलही आक्षेप नोंदविले होते तर तांत्रिक अहवालाचा विचार न करता चुकीच्या पद्धतीने निविदाप्रक्रिया राबविली गेल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनी केला होता. या प्रकरणात महापालिकेचे १५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगत बडगुजर यांनी चौकशी करायचीच तर ती आगरकरांबरोबरच आयुक्त, लेखापाल, लेखापरीक्षक या सर्वांची करा, अशी भूमिका घेतली होती. उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी तर काही धक्कादायक बाबी सभागृहासमोर ठेवल्या होत्या. १३१ कोटी रुपयांचे निविदा मूल्य असताना त्याच्या तीन टक्के सुमारे ३ कोटी ९० लाखांची सुरक्षा अनामत कंत्राटदाराकडून घेणे आवश्यक होते. परंतु नियमाचे उल्लंघन करत सुरक्षा अनामत न घेता करारनामा करण्यात आला. ८० कोटींची बॅँक गॅरंटीही घेताना ती विभागून देण्यात आली. त्यातही बदल करताना स्थायीची मंजुरी घेण्यात आली नाही. सदर प्रकरणात संगनमताने फसवणूक झाल्याचा आरोप करत बग्गा यांनी एलईडीप्रकरणी आयुक्तांसह सर्वांची चौकशी लावावी आणि फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली होती तर शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. महापौर अशोक मुर्तडक यांनी सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत आगरकरांसह सहभागी संशयितांच्या सखोल चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर दीड महिना उलटला तरी अद्याप एलईडीप्रकरणी चौकशीचा ठराव महासभेकडून नगरसचिव विभागाला प्राप्त झाला नसून महापौरांच्या स्वाक्षरीमुळे ठराव अडकला असल्याचे सांगितले जाते. ठरावच प्रलंबित असल्याने चौकशीची प्रक्रियाही थांबली आहे. सदर प्रकरणाची विधिमंडळ समितीनेही दखल घेतली होती. (प्रतिनिधी)