शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

स्वर्गीय सरोदस्वरांनी सकाळ झाली सुरेल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2015 23:45 IST

पार्थो सारथी : कलाविष्काराने रसिक थक्क

नाशिक : सरोदच्या तारांवर विजेच्या चपळाईने फिरणारी ‘त्यांची’ बोटे एकीकडे डोळ्यांना थक्क करीत असताना, सरोदमधून निघणारे सुरेल स्वर रसिकांच्या कानांना अद्भुत अनुभूती देत होते... या कलाविष्कारात अडीच-तीन तास कसे निघून गेले, हे ना मैफलीतल्या रसिकांना उमगले ना कलावंतांना...‘मधुआनंद’ व शंकराचार्य न्यासाचा सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संगीतोत्सव’मध्ये शंकराचार्य संकुलात आज सकाळी सैनिया-मैहर घराण्यातील कोलकात्याचे प्रख्यात सरोदवादक पं. पार्थो सारथी यांचे सरोदवादन रंगले. पं. मधुसूदन कानेटकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बालवयातच पं. सुधामय चौधरी यांच्याकडून, तर तरुणपणात उस्ताद ज्ञानेश खान यांच्याकडून सरोदवादनाची तालीम घेणाऱ्या पं. पार्थो सारथी यांनी आपल्या वादनाला राग अहिर ललतने सुरुवात केली. त्यात त्यांनी विलंबित गत, तर राग भूपाळतोडीत मध्यलयीतील गत पेश केली. त्यानंतर सादर झालेल्या राग परमेश्वरी, जोगिया कालिंगडा या रागांतील गत, झाला, आलापींना रसिकांनी दिलखुलास दाद दिली. आधी संथ, मग विलंबित लयीतील आलापींनी रसिकांना खिळवून ठेवले. भैरवीतील धूनने मैफलीची सांगता झाली. पं. सारथी यांना पं. योगेश समसी यांनी तबल्यावर साथ दिली. कार्यक्रमाला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.