शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्याला चणकापूरचे अखेरचे आवर्तन

By admin | Updated: June 26, 2014 01:00 IST

सटाण्याला चणकापूरचे अखेरचे आवर्तन

 

सटाणा : शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अखेर चणकापूर धरणातील अखेरचे आवर्तन सोडण्यात आल्याने आजपासून शहरास एक दिवसाआड पूर्ववत पाणीपुरवठा सुरू झालेला आहे. यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून पाच दिवसाआड झालेला पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला आहे. दरम्यान, वरुणराजाने आपली कृपादृष्टी न केल्यास शहरवासीयांना आगामी काळ कठीण ठरणार आहे.सटाणा शहरासह परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या चणकापूर व केळझर धरणातील आवर्तनाबरोबरच जलसाठादेखील संपुष्टात आलेला आहे. परिणामी शहरात गेल्या दोन आठवड्यापासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. पाच दिवसाआड शहरात पाणीपुरवठा होत असल्याने शहरवासीयांनी अत्यंत सोशिक पद्धतीने कुठलाही त्रागा न करता शांतपणे पाणीटंचाईला सामोरे जाणे पसंत केले. या उन्हाळ्यात सटाणा नगर परिषदेने शहरवासीयांना कमीत कमी प्रमाणात पाणीटंचाई जाणवू देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेले आहेत. यामुळे शहरवासीयांनीदेखील पालिका प्रशासनाला सहकार्याची भावना दाखविलेली आहे. मात्र सद्यस्थितीत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या केळझर व चणकापूर धरणातील पिण्याचे पाण्याचे आवर्तन संपुष्टात आलेले आहे. दोघा धरणातील जलसाठादेखील संपलेला आहे. शहराला वेळप्रसंगी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे जलस्रोत आटलेले आहेत. यामुळे शहरात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे वरुणराजाने आपली कृपादृष्टी लवकर करावी, अन्यथा शहरवासीयांना पाण्यासाठी मोठ्या संकटाला सोमोर जावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)