शहरं
Join us  
Trending Stories
1
Waqf Law: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
2
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 
3
"बलात्कार करायचा तर करा, पण, आमच्या पती, मुलांना सोडा…’’ मुर्शिदाबाद प्रकरणी कोर्टासमोर आली धक्कादायक माहिती   
4
३६० अंकांनी घसरल्यानंतर सेन्सेक्सची १५०० अंकांची झेप; 'ही' आहेत तेजीची ५ कारणे
5
रेणुका शहाणेंनी सासरी पाळल्या सर्व रुढी-परंपरा; म्हणाल्या, "राणाजींनी कधीच मला..."
6
Video: धोनीने जिंकली चाहत्यांची मनं..!! व्हिलचेअर बसलेल्या चाहतीजवळ स्वत: जाऊन काढला 'सेल्फी'
7
गुजरातमधील पाटण जिल्ह्यात भीषण अपघात; बस आणि ऑटोरिक्षाच्या धडकेत ६ जण ठार!
8
IPL 2025: ट्रेव्हिस हेडच्या जाहिरातीवरून तुफान राडा! RCB ने घेतली कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
9
सलमानचा 'सिकंदर' ठरला फ्लॉप, सपोर्टला आला अक्षय कुमार, म्हणाला-"टाइगर जिंदा है, हमेशा जिंदा रहेगा"
10
रेश्मा केवलरमानी यांचा अमेरिकेत डंका! टाईम मासिकाच्या टॉप १०० यादीत एकमेव भारतीय
11
CM फडणवीसांचा नव्या शैक्षणिक धोरणाला पाठिंबा; म्हणाले, “मराठी आली पाहिजे, पण हिंदी...”
12
ऑटोमॅटीक कार चालवत असाल किंवा एकाच जागी बसून असाल तर काय कराल? डीव्हीटी काय असतो...
13
Aligarh: "मी लग्न करेन, पण एका अटीवर..."; सासूसोबत पळून गेलेला जावई काय म्हणाला?
14
हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा; नेते म्हणाले, “आमच्यावर भाषा लादू शकत नाही”
15
"३ महिन्यात निर्णय घ्या"; कोर्टाच्या निर्णयावर उपराष्ट्रपती नाराज, म्हणाले, "न्यायालय आदेश देऊ शकत नाही"
16
२०३२ पर्यंत गुरुची अतिचारी गती: ९ राशींना गुरुबळ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; बक्कळ लाभ, भरभराट!
17
माझा आजचा दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे; कारण सांगत धनंजय मुंडेंनी दिली माहिती
18
IPL 2025: २५ दिवसांपूर्वी केलेली भविष्यवाणी आज काव्या मारनला हसवणार की रडवणार? प्रकरण काय
19
पंचांशी वाद घातल्याबद्दल मुनाफ पटेलला बीसीसीआयने ठोठावला दंड, दिल्ली- राजस्थान सामन्यात काय घडलंं?
20
चीनच्या कंपनीने मारुतीच्या फ्राँक्सची कॉपी केली; 1200 किमी रेंजवाली एसयुव्ही लाँच केली

लासलगावी कांदा १७ रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 01:03 IST

किमान निर्यातमूल्य कमी केल्यानंतरही अपेक्षित निर्यात न वाढल्याने व मोठी आवक झाल्याने बुधवारी लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात कमाल ५००, तर सरासरी ३०० रुपयांची घसरण झाली. दर घसरल्याने देवळा, सटाण्यात राष्टÑवादी काँग्रेसतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

लासलगाव : किमान निर्यातमूल्य कमी केल्यानंतरही अपेक्षित निर्यात न वाढल्याने व मोठी आवक झाल्याने बुधवारी लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात कमाल ५००, तर सरासरी ३०० रुपयांची घसरण झाली. दर घसरल्याने देवळा, सटाण्यात राष्टÑवादी काँग्रेसतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.  लाल कांद्याची ६०० वाहनांतून आवक झाली. बाजारभाव प्रतिक्विंटल किमान ९५०, कमाल १,९०५ तर सरासरी १,६५० रूपये होते. गेल्या आठवड्याच्या तुलनेत १,२०० रुपयांची घसरण झाली. कांदा क्विंटलमागे दोन हजार रुपयांच्या आत आल्याने शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ८५ हजार ५४४ क्विंटल आवक होऊन किमान भाव एक हजार तर कमाल भाव ३,१५८ रुपये होते.निर्यातमूल्य कमी करूनही घसरण कायम गुजरात, मध्य प्रदेशसह इतर राज्यांतील बाजारपेठेत नवीन कांदा मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने तेजीत असलेल्या कांद्याचे दर सोमवारपासून घसरत आहेत. किमान निर्यातमूल्य १५० डॉलरने कमी करून ७०० डॉलर प्रतिटन झाल्यानंतर भाव वाढत नसल्याचे चित्र आहे.  राज्यात लाल कांद्याबरोबरच रांगडा कांद्याच्या आवकेत वाढ झाल्याने लासलगाव बाजारपेठेतही कांदा घसरला.  कांद्याच्या दरात सातत्याने घसरण सुरू असल्याच्या निषेधार्थ बुधवारी नाशिक जिल्ह्णातील देवळा, सटाण्यात राष्टÑवादी काँग्रेसतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कांदा निर्यात शुल्क, शेतमाल आॅनलाईन खरेदी आदी विविध मागण्यांसाठी आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

टॅग्स :onionकांदाmarket yardमार्केट यार्ड