शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

दिंड्यांनाही नोटाबंदीचा फटका

By admin | Updated: January 21, 2017 00:07 IST

संत निवृत्तिनाथ यात्रा : वारकऱ्यांची संख्या यंदा निम्म्याने घटली

भाग्यश्री मुळे :  नाशिक
वाढती थंडी, नोटाबंदीमुळे आर्थिक चणचण, अपुरी शेतीची कामे आदि विविध कारणांमुळे यंदा त्र्यंबकेश्वरच्या निवृत्तिनाथ यात्रेला येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या निम्म्याने घटली आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने वारकरी असणाऱ्या दिंड्या यावर्षी छोट्या झाल्याचे दिसून येत आहे. आर्थिक घडी सुरळीत झाल्यानंतर यावर्षी नाही, तर पुढील वर्षी दिंडीबरोबर यात्रेला जाऊ, असा पवित्रा घेत बहुतांशी वारकऱ्यांनी यंदा घरीच राहणे पसंत केले आहे. नाशिकमध्ये दाखल झालेल्या दिंड्यांशी संवाद साधला असता त्यातील वारकऱ्यांनीही या गोष्टीशी सहमती दर्शविली.  नोव्हेंबरमध्ये मोदी सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केल्यानंतर गत अडीच महिन्यांपासून देशातील आर्थिक घडी विस्कळीत झाली असून, सर्वच क्षेत्रांमध्ये त्याचा परिणाम दिसून येत आहे. दरवर्षी शेतीची कामे मार्गी लावून श्रद्धेने संत निवृत्तिनाथ महाराज यांच्या यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दिंडीद्वारे श्रद्धेने पायी त्र्यंबकनगरीला येत असतात. आबालवृद्धांचा त्यात सक्रिय सहभाग असतो. यंदा दिंड्यांमधील वारकऱ्यांची संख्या रोडावल्याचे चित्र दिसून येत आहे. त्या कारणांचा शोध घेतला असता नोटाबंदीनंतर प्रामुख्याने शेतीकामावर अवलंबून असणाऱ्या वारकऱ्यांना पैशांची जाणवत असलेली चणचण, रेंगाळलेली शेतीकामे आणि वाढती थंडी या गोष्टी समोर आल्या. आर्थिक संकटात सापडल्याने वारकऱ्यांनाही यंदा माउलींच्या सेवेऐवजी कुटुंबाची आर्थिक घडी बसवण्याला प्राधान्य द्यावे लागत असल्याचे दिसून येत आहे. दिंड्यांबरोबरच त्र्यंबकेश्वरी भरणाऱ्या यात्रेलाही आर्थिक फटका बसतो की काय, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.