बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार

By Admin | Updated: September 11, 2016 00:43 IST2016-09-11T00:42:44+5:302016-09-11T00:43:01+5:30

बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार

Killing three goats in a leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार

बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार


जायखेडा : बिलपुरी, ता. बागलाण येथील गावंदर शिवारातील नामदेव पवार यांच्या शेतात बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून तीन शळ्यांना ठार केले. काल दुपारी ही घटना घडली.
जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर यांचे निलंबन व्हावे यासाठी गेल्या दोन दिवसांपासून बिलपुरी येथील ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. सर्व जण शेतीबाडीची कामे सोडून आपल्या मुलाबाळांसह या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची पाळीव जनावरे शेतात सुनीच होती. याच संधीचा फायदा घेत आज दुपारी बिबट्याने नामदेव पवार या शेतकऱ्याच्या तीन शेळ्या फस्त केल्या आहेत. बिलपुरी हे गाव डोंगरपायथ्याशी वसले असल्याने व चौहू बाजूने छोट्या मोठ्या डोंगरांनी वेढले असल्याने येथे बिबट्यांचा मुक्तसंचार आहे. वनरक्षक अक्षय हेमाडे यांनी घटनास्थळी पहाणी करून पंचनामा केला. शेतकऱ्यास नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Killing three goats in a leopard attack