केबीसी फ सवणुकीची रक्कम १५५ कोटींपर्यंत

By Admin | Updated: July 30, 2014 00:18 IST2014-07-29T23:40:49+5:302014-07-30T00:18:47+5:30

केबीसी फ सवणुकीची रक्कम १५५ कोटींपर्यंत

KBC funding amount to Rs. 155 crores | केबीसी फ सवणुकीची रक्कम १५५ कोटींपर्यंत

केबीसी फ सवणुकीची रक्कम १५५ कोटींपर्यंत

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर आलिशान कार्यालय असलेल्या, तसेच गुंतवणूकदारांना तिप्पट रकमेचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या केबीसी मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांविरुद्ध मंगळवारपर्यंत ५,९०० गुंतवणूकदारांनी तक्रारी नोंदविल्या असून, फसवणुकीची रक्कम १५५ कोटींपर्यंत पोहोचल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ए़ एस़ चांदखेडे यांनी दिली़
केबीसी फ सवणुकीतील तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़ केबीसीचे प्रमुख संचालक भाऊसाहेब चव्हाण व त्याची पत्नी आरती चव्हाण हे सिंगापूरला पळून गेले आहेत़ या प्रकरणी पोलिसांनी संचालक बापूसाहेब छबू चव्हाण, त्याची पत्नी साधना बापू चव्हाण, नानासाहेब चव्हाण, कंपनीचा व्यवस्थापक पंकज सीताराम शिंदे, वाहनचालक नितीन पोपटराव शिंदे, पोलीस कर्मचारी संजय वामनराव जगताप, त्याची पत्नी कौशल्या जगताप, भारती मंडलिक शिलेदार या आठ संशयितांना अटक केली होती़ या सर्वांची पोलीस कोठडीची मुदत संपली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत़
केबीसी प्रकरणात एजंट तसेच गुंतवणूक केलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिका पुष्पलता निकम व त्यांचा मुलगा सागर निकम याने आत्महत्त्या केलेली आहे, तर दोघांचा हृदयविकाराने मृत्यू झाला असून, सिडकोतील एका वडापाव विक्रेत्याने काही दिवसांपूर्वी विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला़ या फ सवणूक प्रकरणात अटक केलेल्या संशयितांचे बँक खाते व स्थावर मालमत्ता अशी एकूण ७३ कोटींची मालमत्ता पोलिसांनी सील केली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: KBC funding amount to Rs. 155 crores