शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

कांबळे याच्या क्रूरतेने सारेच हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:56 IST

पाठीमागून लाथ मारल्याने जमिनीवर पडलेला विद्यार्थी वेदनेने विव्हळत असतानाच दुसऱ्या विद्यार्थ्याला पलंगावरून फेकून दिल्याने तोही जखमी झाला. एवढ्यावरच तो कर्मचारी थांबला नाही तर त्याने एका विद्यार्थ्याच्या कानशिलात मारल्याने त्याच्या कानाचा पडदाच फाटला. लघुशंकेसाठी उभ्या असलेल्या एकाच्या पाठीत लाथ घालून त्यालाही जखमी करण्यात आले. कर्मचाºयाच्या क्रूरतेबाबत पीडित विद्यार्थ्यांनी अनेक घटना सांगितल्याने सभापतींसह सारेच हादरले.

ठळक मुद्देअंध विद्यार्थी मारहाण प्रकरण : सभापतींसमोर कथन केली आपबिती

नाशिक : पाठीमागून लाथ मारल्याने जमिनीवर पडलेला विद्यार्थी वेदनेने विव्हळत असतानाच दुसऱ्या विद्यार्थ्याला पलंगावरून फेकून दिल्याने तोही जखमी झाला. एवढ्यावरच तो कर्मचारी थांबला नाही तर त्याने एका विद्यार्थ्याच्या कानशिलात मारल्याने त्याच्या कानाचा पडदाच फाटला. लघुशंकेसाठी उभ्या असलेल्या एकाच्या पाठीत लाथ घालून त्यालाही जखमी करण्यात आले. कर्मचाºयाच्या क्रूरतेबाबत पीडित विद्यार्थ्यांनी अनेक घटना सांगितल्याने सभापतींसह सारेच हादरले.अंध विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर बुधवारी समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांनी त्या पीडित विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर अत्याचाराचा पाढा वाचला. यावेळी सभापती चारोस्कर यांनी पीडित विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर कांबळे यांच्या क्रूरतेची अनेक प्रकरणे समोर आली. येथील शासकीय अंध शाळेत एकूण ३५ निवासी विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांची काळजी घेण्यासाठी काळजीवाहक कर्मचारी संदीप कांबळे याची नेमणूक करण्यात आलेली आहे.मात्र काळजीवाहकानेच या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुढे आला आहे. यावेळी सुदाम पावसे या विद्यार्थ्याने घडलेल्या प्रकरणाची माहिती सभापतींना दिली. या मारहाणीत पावसे याच्या डोक्याला बॅट लागल्याने तो जखमी झाला आहे. सागर मुरकुटे याच्या कानशिलात लगावल्याने त्याच्या कानाचा पडदा फाटल्याने त्याला ऐकू येत नसून त्याचे पालक त्याला घरी घेऊन गेले आहेत. यावेळी येथे उपस्थित सर्वच विद्यार्थ्यांनी कांबळे याच्या दहशतीचे किस्से सांगितले.कांबळे याने विद्यार्थ्यांना लघुशंका कारताना वारंवार लाथा मारणे, पलंगावरून फेकून देणे, रोज दारू पिऊन धिंगाणा घालणे, संगणकावर पिक्चर पाहत बसणे, जातिवाचक शिवीगाळ करणे आदी गंभीर आरोप विद्यार्थांनी केले आहेत. विशेष म्हणजे हा सारा प्रकार विद्यार्थी सांगत असताना अंधशाळेच्या अधीक्षक वाझट यांंनी मात्र आपणास याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. वाझट या शासकीय निवासस्थानी न राहाता मुंबईनाका येथे राहात असल्याचेही समोर आले. याप्रकरणी सुनीता चारोस्कर यांनी संबंधित कर्मचाºयाला तत्काळ बडतर्फ करण्याची सूचना केली आहे. याप्रकरणी स्वत: लक्ष घालून संबंधितावर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य ज्योती जाधवही उपस्थित होत्या.माहिती दडविलीसमाजकल्याणचे अधिकारी नीलेश पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी केली होती. मात्र त्यांनी सभापतींना कोणतीही माहिती न देता परस्पर मुंबईला निघून गेले. याबाबत त्यांनाही विचारणा करण्यात येणार असल्याचे सभापती चारोस्कर यांनी सांगितले. 

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदSocial welfare divisional officeसमाजकल्याण उपायुक्त कार्यालय