शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

कलात्मक लघुपटांनी रंगला रविवारी कलातीर्थ महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:33 IST

नाशिक : चंदेरी दुनियेचे संस्थापक चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या १५०व्या जयंतीच्या औचित्याने चित्रपटसृष्टीत अढळपद मिळवलेल्या फाळके आणि पेंढारकर ...

नाशिक : चंदेरी दुनियेचे संस्थापक चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या १५०व्या जयंतीच्या औचित्याने चित्रपटसृष्टीत अढळपद मिळवलेल्या फाळके आणि पेंढारकर या दोन महान कलावंतांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत रविवारी कलातीर्थ लघुपट महोत्सव रंगला.

भारतीय चित्रसाधना आणि शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने कलातीर्थ लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात राज्यभरातील विविध जिल्हे तसेच सिकंदराबाद येथून असे एकूण ७४ स्पर्धक सहभागी झाले होते. भारतीय चित्रपटसृष्टीला जन्म देणाऱ्या दादासाहेब फाळके तसेच तिला संजीवनी प्रदान करणाऱ्या भालजी पेंढारकर या दोन्ही श्रेष्ठ चित्रपटतपस्वींचे योगदान सर्वश्रुत आहे. त्यांना अभिवादन करण्याचा हा प्रयत्न कलातीर्थच्या वतीने करण्यात आल्याचे जयदीप पवार यांनी सांगितले. महोत्सवाच्या आयोजनासाठी कलातीर्थचे शौनक गायधनी, सुमंत वैद्य, जयदीप पवार, अभिषेक पिंगळे, महेश चौधरी, तेजस बिल्दीकर, तेजस देव, स्वरदा लगड कुलकर्णी, पुष्कर पाडेकर, श्रीकृष्ण कुलकर्णी, अवंती रत्नपारखी, पराग लेले यांनी विशेष परिश्रम घेतले.

कर्मभूमीत फाळके कुटुंबीयांचा सत्कार

भालजी पेंढारकर यांचे नातू भरत दैनी आणि नात सई पेंढारकर-सपकाळे यांच्या हस्ते दादासाहेब फाळके यांची नात स्वाती फाळके-काळे, वासंती फाळके, पणती गिरिजा फाळके- मराठे यांना सन्मानित करण्यात आले. फाळके यांच्या १५०व्या जयंतीच्या औचित्याने करण्यात आलेल्या या सत्कारास रसिक प्रेक्षकांनीदेखील भरभरून दाद दिली. फाळके यांच्या कर्मभूमीत त्यांच्या पुढच्या पिढ्यांचा सन्मान झाल्याबद्दल फाळके कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.

फोटो - १०पीएचजेएन ९६

दादासाहेब फाळके यांच्या कुटुंबातील वासंती फाळके, स्वाती फाळके-काळे, गिरिजा फाळके -मराठे यांचा सत्कार करताना भरत दैनी, सई पेंढारकर-सपकाळे, देवीदास जोशी, परीक्षक चंद्रशेखर कुलकर्णी.