शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मानाच्या फेट्यांना मिळतेय केराची टोपली

By admin | Updated: March 30, 2017 22:28 IST

बेलगाव कुऱ्हे : विवाहसमारंभात वधू-वर पक्षांकढून वऱ्हाडी मंडळींच्या डोक्याला बांधण्यात येणारा फेटा दोन मिनिटांतच मातीमोल होत आहे

 बेलगाव कुऱ्हे : विवाहसमारंभात वधू-वर पक्षांकढून वऱ्हाडी मंडळींच्या डोक्याला बांधण्यात येणारा फेटा दोन मिनिटांतच मातीमोल होत असल्याने फेट्यांवर यजमानांनी खर्च करावा का, असा प्रश्न आता निर्माण होऊन यावर विचार करण्याची वेळ आली आहे. एकेकाळी विवाह सोहळ्यात फेट्यांना महत्त्व होते. पाहुण्यांना मानपान म्हणून मोठ्या आपुलकीने फेटा बांधला जायचा. मात्र, सध्या मानाच्या या फेट्यांना समाजाकडून केराची टोपली मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.विवाहात वर-वधू पित्याकडून मिळणाऱ्या फेट्यांचा ग्रामीण भागात पशुपालक व शेतकरी शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी बैलांना बांधण्यासाठी सर्रास वापर करीत आहेत. महिलांकडूनही विहिरीतून पाणी काढण्यासाठी या फेट्यांचा वापर होताना दिसत आहे. हे चित्र फक्त शहरी भागातही दिसून येत आहे. लहान मुलांना झोका बांधण्यासाठी, किराणा व्यापारी दुचाकीवर मालाची पोती, पिशव्या बांधण्यासाठी, अनेक नागरिक सिलिंडरची वाहतूक करण्यासाठी फेट्यांचा वापर करतात. मुंबई येथील मच्छीमार मार्केटाच्या ठिकाणी माल वाहून नेण्यासाठीही फेट्यांचा उपयोग होतो. बाजार समितीपर्यंत भाजीपाला जाळ्या बांधून नेण्यासाठीसुद्धा फेट्यांचा उपयोग करतात.ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिक फेट्यांपासून नाडा बनविण्याच्या कामात सदैव व्यस्त असतात. विवाहात मोठ्या सन्मानाने पाहुण्यांना फेटा बांधला जातो. लग्नात कोणाचा रु सवा फुगवा नको म्हणून वधू-वर कुटुंबीयांकडून फेट्यांवर अमाप खर्च केला जातो. लग्न समारंभात फेट्याला मानाचे स्थान आहे. साधारण एका फेट्यासाठी ३० ते ४० रु पये मोजावे लागतात. यावर विवाहात दोन्ही पक्षांकडून ६० ते ७० हजार रु पये खर्च होतो. २००५ पूर्वी हाच फेटा सुमारे पाच ते सात रु पये किमतीला होता. आता मात्र त्याची किंमत दुपटीने वाढूनही त्याची मागणी कमी झालेली नाही. हाच फेटा पूर्वी पाच ते सहा मीटरचा असायचा आता मात्र तो तीन ते चार मीटरचा असतो. त्यामुळे त्याला फेटा म्हणायचे का चिंधी, असा प्रश्न निर्माण होतो. (वार्ताहर)