शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी सरकारमुळेच जायकवाडीची जबाबदारी नाशिकवर : देवयानी फरांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:20 IST

जायकवाडी धरण बांधले गेले तेव्हापासून आजपर्यंत फक्त पाच वेळा हे धरण भरले आहे. या धरणाची क्षमता ८१ टी.एम.सी. असली तरी धरणाची वार्षिक सरासरी ४१ टी.एम.सी. इतकी आहे. २००५ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने गोदावरी पाटबंधारे महामंडळाची स्थापना करून समन्यायी पाणी वाटपाचा कायदा संमत केल्यामुळे ४० टी.एम.सी. पाण्याची तूट भरून काढण्याची जबाबदारी नाशिकवर आली असल्याचा आरोप आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे.

ठळक मुद्देकायद्याचा गैरवापर : आडगाव ग्रामस्थांतर्फे जाहीर सत्कार समारंभात आरोप

आडगाव : जायकवाडी धरण बांधले गेले तेव्हापासून आजपर्यंत फक्त पाच वेळा हे धरण भरले आहे. या धरणाची क्षमता ८१ टी.एम.सी. असली तरी धरणाची वार्षिक सरासरी ४१ टी.एम.सी. इतकी आहे. २००५ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने गोदावरी पाटबंधारे महामंडळाची स्थापना करून समन्यायी पाणी वाटपाचा कायदा संमत केल्यामुळे ४० टी.एम.सी. पाण्याची तूट भरून काढण्याची जबाबदारी नाशिकवर आली असल्याचा आरोप आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे.गंगापूर व पालखेड धरणांतील पाणी जायकवाडीला जाण्यापासून वाचविल्याबद्दल आडगाव ग्रामस्थांच्या वतीने आमदार देवयानी फरांदे यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. व्यासपीठावर नगरसेवक उद्धव निमसे, नगरसेवक सुरेश खेताडे, नगरसेविका शीतल माळोदे, माजी नगरसेवक मधुकर मते, पोलीस पाटील एकनाथ मते, संजय तुंगार उपस्थित होते. आ. फरांदे म्हणाल्या, फक्त पिण्याच्या पाण्याची तरतूद असती तर यदा कदाचित आपल्याला मोठा तोटा झाला नसता पण समन्यायी पाणी वाटपामुळे आपल्याकडील १० तालुके दुष्काळी असूनदेखील आपल्या हक्काचे पाणी सोडावे लागत आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यामुळे सरकारचे हात बांधलेले पण त्यावर मार्ग म्हणून मी गोदावरी पाटबंधारे महामंडळाला मुकणे धरणातून पाणी सोडण्याचे सांगितले तरीही त्यांनी काहीही म्हणणे ऐकून न घेता, धरणातून काही पाणी सोडले पण कोर्टाच्या निकालातील तरतुदीचा आधार घेत आपली बाजू ऐकायला भाग पाडून त्यांना मुकणे धरणात पिण्याचे आरक्षित असलेले पाणी सोडण्याची विनंती केल्यामुळे गंगापूर धरणाचे दरवाजे बंद झाले आणि शेतीसाठी पाणी वाचवू शकले. असे असले तरी ही लढाई एवढ्यात संपणार नसल्याचे सांगत सर्वांनी पाण्यासाठी राजकीय भेद विसरून एक होण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी नगरसेवक उद्धव निमसे, माजी नगरसेवक मधुकर मते, पोलीस पाटील एकनाथ मते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.पाणीवाटप संस्था स्थापन कराआमदार फरांदे यांनी शेतकऱ्यांना, ‘पाणी आपल्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे’ या युक्तीप्रमाणे गावागावात पाणीवाटप संस्था स्थापन करून आपल्याला आवश्यक पाण्याची मागणी नोंदवा त्यावेळी तुमच्या मागणीचा विचार केला जाईल, नाही तर आपल्याकडील शेतकºयांना पश्चात्ताप करावा लागेल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकDevyani Farandeदेवयानी फरांदेJayakwadi Damजायकवाडी धरण