नांदगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जनाबाई गायकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 12:03 AM2020-10-01T00:03:05+5:302020-10-01T01:07:50+5:30

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जनाबाई गायकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच अनिता मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

Janabai Gaikar as Deputy Panch of Nandgaon Budruk Gram Panchayat | नांदगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जनाबाई गायकर

नांदगांव बुद्रुक च्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झालेल्या जनाबाई गायकर यांचा सत्कार करताना अनिता मोरे, राजाराम गायकर व ग्रामपंचायत सदस्य.

Next
ठळक मुद्देआवर्तन पद्धतीने उपसरपंच राजाराम गायकर यांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जनाबाई गायकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच अनिता मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. आवर्तन पद्धतीने उपसरपंच राजाराम गायकर यांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले होते. निर्धारित वेळेत जनाबाई गायकर यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही उमेदवारी अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक देविदास जाधव यांनी काम पाहीले. यावेळी माजी उपसरपंच राजाराम गायकर, दत्तूू पावडे, अरु ण शिरसाठ, अशोक गायकर, मनीषा गायकर, सुवर्णा पागेरे, लता शिरसाठ, मंगल कोकाटे, संतोष शिरसाठ, बंशी जाधव, पंडित गायकर, देविदास मोरे, उल्हास संधान, संजय जाधव, ज्ञानेश्वर पागेरे, हिरामण गायकर, भाऊसाहेब गायकर, तुकाराम गायकर, नाना गायकर, रामचंद्र गायकर आदी उपस्थित होते.

 

Web Title: Janabai Gaikar as Deputy Panch of Nandgaon Budruk Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.